Badlapur Tourism : बदलापूरजवळ डोंगररांगांमध्ये वसलाय निसर्गाचा अद्भुत खजिना, खूप कमी लोकांना माहितेय 'हे' ठिकाण

Shreya Maskar

वन डे पिकनिक स्पॉट

तुम्ही वीकेंडला वन डे ट्रिप प्लान करत असाल तर बदलापूरजवळील चिखलोली धरण सुंदर लोकेशन आहे. हा छोटा पिकनिक स्पॉट आहे, जो खूप कमी लोकांना माहितेय.

One Day Picnic Spot | yandex

चिखलोली धरण

चिखलोली धरण हे ठाणे जिल्ह्यातील बदलापूरजवळील एक सुंदर पर्यटन स्थळ आहे. पावसाळ्यात येथील धबधबे आणि हिरवाईमुळे पर्यटकांना आकर्षित करते.

Dam | google

जलस्त्रोत

चिखलोली धरण हे अंबरनाथ आणि बदलापूर परिसरातील एक महत्त्वाचा जलस्त्रोत आहे.चिखलोली धरण हे निसर्गरम्य असून पर्यटनासाठी देखील ओळखले जाते.

Water resources | google

कधी जावे?

हिवाळ्यात आणि पावसाळ्यात येथे निसर्गरम्य वातावरण अनुभवता येते. ज्यामुळे पर्यटकांसाठी एक लोकप्रिय ठिकाण आहे. येथे धबधब्याचा आनंद घेता येतो.

Dam | google

फोटोशूट

पावसाळ्यात वीकेंडला तुम्ही येथे नक्की जाऊ शकता. सुंदर फोटोशूटसाठी हे सुंदर लोकेशन आहे. फॅमिलीसोबत येथे निवांत वेळ घालवा.

Dam | google

बदलापूर पर्यटन स्थळे

बदलापूर निसर्गरम्य धरणे, धबधबे आणि ऐतिहासिक किल्ल्यांसाठी प्रसिद्ध आहे. येथे कोंडेश्वर मंदिर आणि धबधबा, बारवी धरण, चंदेरी किल्ला, चिकलोली धरण आणि उल्हास नदी आहे.

Chanderi Fort | google

सूर्यास्त

चिखलोली येथून सूर्यास्ताचा सुंदर नजारा पाहायला मिळतो. तुमचा आठवड्याभराचा ताण निघून जाईल आणि तुम्ही फ्रेश व्हाल.

Dam | google

टीप

वरील माहितीचा उद्देश केवळ ऐतिहासिक वारसा आणि पर्यटन स्थळांची ओळख करून देणे हा आहे. यातील माहिती इंटरनेटवरील उपलब्ध सोर्समधून घेण्यात आली. कोणत्याही ऐतिहासिक वादाशी किंवा दाव्याशी आमचा संबंध नाही.

Picnic Spot | yandex

Matheran Tourism : धडकी भरवणारी दरी आणि घनदाट जंगल, माथेरानच्या 'या' ट्रेकसमोर स्वित्झर्लंडही फिके पडेल

Matheran Tourism | saam tv
येथे क्लिक करा