राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बदल्यांचा धडाका; नागपुरातील बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली, कुठे झाली नियुक्ती?

ias officer transfer news : सलग दुसऱ्या दिवशी सनदी अधिकाऱ्यांची बदल्या सुरू आहेत. नागपुरातील बड्या IAS अधिकाऱ्यांची बदली झालीये.
ias officer
ias officer transfer Saam tv
Published On
Summary

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

राज्यात बुधवारी दोन अधिकाऱ्यांची झाली होती बदली

आज आणखी एका वरिष्ठ आयएएस अधिकाऱ्यांची बदली

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बदल्यांचा धडाका सुरू आहे. महाराष्ट्रात बुधवारी दोन आयएएस अधिकाऱ्यांची बदली झाली. त्यानंतर आज गुरुवारी आणखी एका बड्या IAS अधिकाऱ्यांची झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशानंतर IAS अधिकाऱ्यांची बदली झाल्याची माहिती मिळत आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. अभिजीत चौधरी यांची बुधवारी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, महानगर आयुक्तपदी बदली झाली. त्यानंतर नागपूर महानगरपालिकेचे आयुक्तपद रिक्त झालं होतं. यामुळे नागपूर महानगर पालिकेच्या रिक्त झालेल्या मनपा आयुक्तपदी डॉ. विपीन इटनकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

डॉ. विपीन इटनकर यांच्याकडे सध्या नागपूर जिल्हाधिकारी पदाचाही अतिरिक्त कार्यभार कायम असणार आहे. डॉ. विपीन इटनकर हे ऑगस्ट 2022 मध्ये नागपूरच्या जिल्हाधिकारीपदी रुजू झाले होते. पुढील काही दिवसांत नागपूर जिल्हाधिकारी पदावर इतर IAS अधिकाऱ्यांची नियुक्ती होणार का, हे पाहावे लागणार आहे.

ias officer
शेकडो कोटींचा पीक विमा घोटाळा;उपग्रहाने केला भंडाफोड, वाचा खास रिपोर्ट

दोन अधिकाऱ्यांची बुधवारी बदली

राज्यात २ बड्या आयएएस अधिकाऱ्यांची बुधवारी बदली झाली. पीएमआरडीचे योगेश म्हसे यांची मुंबईतील अल्पसंख्याक विकास विभागात बदली झाली. नागपूरचे महापालिका आयुक्त डॉ अभिजित चौधरी यांची देखील बदली झाली.

ias officer
गजनी, पैलवान ते हिस्ट्री सीटर गुन्हेगार; निलेश घायवळच्या दिली होती कानफटात, गुंड सागर मोहोळकरची कुंडली आली समोर

डॉ. अभिजित चौधरी पीएमआरडीएचे महानगर आयुक्तपदी नियुक्ती झाली आहे. पुरंदर विमानतळ, विमानतळासाठी शेतकऱ्यांच्या जमीन भूसंपादन, पुणे जिल्ह्यातील रिंग रोड अशा अनेक प्रकल्पांची जबाबदारी आता चौधरी यांच्यावर असणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com