RR vs RCB IPL 2024 reasons behind royal challengers Bangalore defeat against Rajasthan Royals amd2000 Twitter
Sports

RR vs RCB,IPL 2024: RCB चं नेमकं चुकलं तरी कुठं? ही आहेत पराभवाची ३ मोठी कारणं

Reasons Behind RCB Defeat: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आयपीएल २०२४ स्पर्धेत चौथा पराभव झाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते.

Ankush Dhavre

Reasons Behind Royal Challengers Bangalore Defeats:

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाचा आयपीएल २०२४ स्पर्धेत चौथा पराभव झाला आहे. शनिवारी झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्स संघाने ६ गडी राखून विजय मिळवला.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटक अखेर ३ गडी बाद १८३ धावा केल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना बटलरच्या शतकी खेळीच्या बळावर राजस्थान रॉयल्स संघाने एकतर्फी विजय मिळवला. दरम्यान या पराभवाची नेमकी कारणं काय? जाणून घ्या.

चांगली सुरुवात..मात्र शेवट कडू..

या सामन्यात नाणेफेक गमावून फलंदाजीसाठी आलेल्या रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला चांगली सुरुवात मिळाली होती. फाफ डू प्लेसिस आणि विराट कोहलीने शतकी भागीदारी केली. मात्र डू प्लेसिस बाद झाल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला मोठी झेप घेता आली नाही. सुरुवात चांगली मिळाली असतानाही रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ २०० धावांचा आकडा गाठू शकला नाही. डू प्लेसिस बाद झाल्यानंतर फलंदाजीला आलेले ग्लेन मॅक्सवेल आणि सौरव चौहान स्वस्तात माघारी परतले. (Cricket news in marathi)

दुसऱ्या डावात अडचणी वाढल्या...

सामन्यानंतर बोलताना फाफ डू प्लेसिस म्हणाला की, पहिल्या डावात फलंदाजी करणं आव्हानात्मक होतं. मात्र दुसऱ्या डावात दवाचं प्रमाण वाढल्याने फलंदाजी करणं सोपं झालं.

खराब क्षेत्ररक्षण...

धावांचा बचाव करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून ६ वे षटक टाकण्यासाठी मयांक डागर गोलंदाजीला आला होता. या षटकात त्याने तब्बल २० धावा खर्च केल्या. यासह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघातील क्षेत्ररक्षकांनी देखील खराब क्षेत्ररक्षण केलं. त्यांनी सोपे झेल सोडले. परिणामी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाला हा सामना गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Divya Deshmukh : गँडमास्टर दिव्या देशमुखचं फडणवीसांकडून कौतुक, व्हिडीओ कॉलद्वारे दिल्या शुभेच्छा

Mumbai Firing : मुंबई हादरली! 32 वर्षीय तरुणीवर गोळीबार, परिसरात खळबळ

Tharवाल्याचा विकृतपणा! आधी कट मारला, नंतर रिव्हर्स घेत वृद्धाच्या अंगावर घातली भरधाव कार|Video Viral

Pune Rave Party : एकनाथ खडसेंचा जावई अडकला की, अडकवला? पुणे रेव्ह पार्टी प्रकरणात आता नवा ट्विस्ट

CPR Controversy : महिलेला CPR देणे शिक्षकाला पडलं महागात; चुकीच्या पद्धतीने हात लावल्याचा आरोप

SCROLL FOR NEXT