इंडियन प्रीमियर लीगच्या १७ व्या हंगामात रोमांचक सामने सुरु आहेत. या हंगामात ६ एप्रिलपर्यंत एकूण १९ सामने झाले आहेत. आतापर्यंतच्या गुणतालिकेत पहिल्या स्थानी राजस्थान रॉयल्स पोहोचली आहे. तर पाचवेळा चॅम्पियन ठरलेली मुंबई इंडियन्स गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर आहे.
आयपीएलमध्ये मागील हंगामात ७४ सामने झाले. आयपीएल २०२४ मध्ये सामना जिंकणाऱ्या संघाला २ गुण मिळत आहे. तर हरणाऱ्या संघाला एकही गुण मिळत नाहीये. मॅच ड्रॉ झाली तर दोन्ही संघाला १-१ गुण मिळतो. या हंगामाचा अंतिम सामना १९ मे रोजी होणार आहे.
लीग स्टेजनंतर प्लेऑफ सुरु होणार आहे. आयपीएल २०२४ मध्ये प्लेऑफ सामने २१ मेपासून सुरु होणार आहे. तर २६ मे रोजी अंतिम सामना खेळला जाईल.
२१ मे रोजी पहिला क्वालिफायर सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळविण्यात येईल. २२ मे रोजी याच स्टेडियमवर एलिमिनेटर सामना खेळविण्यात येईल. तर २४ मे रोजी दुसरा क्वालिफायर सामना चेन्नईच्या एमए चिदंबरम स्टेडियमवर खेळविण्यात येईल. त्यानंतर चेपॉकमध्ये अंतिम सामना होईल.
क्वालिफायर : १ - ग्रुप स्टेजमध्ये पहिल्या आणि दुसऱ्या स्थानी असणाऱ्या संघामध्ये सामना होईल.
एलिमिनेटर : ग्रुप स्टेजमध्ये तिसऱ्या आणि चौथ्या स्थानी असणाऱ्या संघामध्ये सामना होईल.
क्वालिफायर २ : क्वालिफायर -१ मध्ये पराभूत होणारा संघ आणि एलिमिनेटरमध्ये जिंकणाऱ्या संघामध्ये सामना होईल.
फायनल : क्लालिफायर- १ आणि २ सामन्यातील विजेत्या संघामध्ये सामना होईल.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.