राजस्थान रायल्सने विजयाची घोडदौड कायम ठेवत सलग ४ सामने जिंकून गुणतालीकेत अव्वल स्थान पटकावलं आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर आज झालेल्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने ६ गडी राखून रॉयल्स चॅलेंजर्स बंगळुरुवर दणदणीत विजय मिळवला. विराट कोहलीने नाबाद ११३ धावा करत संघाला चांगली धावसंख्या उभारून दिली होती. मात्र, विराटची शतकी खेळी व्यर्थ ठरली. जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्या तुफानी फटकेबाजीमुळे राजस्थान रॉयल्सने १९ शटकातचं १८४ धावांचा टप्पा अगदी सहज गाठला.
एकीकडे राजस्थानने 4 सामने जिंकले असून संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. तर बेंगळुरूला ५ सामन्यांत ४ वेळा पराभवाला सामोरं जावं लागलं आहे. केवळ एका सामन्यात विजय मिळवता आला आहे. बेंगळुरूचा हा सलग दुसरा पराभव. राजस्थान रायल्स संघ सलग चौथ्या विजयासह गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे.
(साम टीव्ही'चं व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)
राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार संजू सॅमसनने नाणेफेक जिंकलं आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. दरम्यान प्रथम फलंदाजी करताना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाने २० षटकअखेर ३ गडी बाद १८३ धावा केल्या होत्या. राजस्थान रॉयल्स संघासमोर विजयासाठी १८४ धावांचं लक्ष्य होतं.
मोसमाच्या सुरुवातीला अपयशी ठरलेला कर्णधार डू प्लेसिस यावेळी अधिक चांगल्या फॉर्ममध्ये दिसत होता पण अर्धशतकापूर्वी तो युझवेंद्र चहलच्या चेंडूवर बाद झाला. ग्लेन मॅक्सवेलला आतापर्यंत मोठी धावसंख्या उभारता आलेली नाही. यावरेळी तो फ्लॉप झाला. तर आयपीएलमध्ये यंदा पदार्पण करणाऱ्या सौरव चौहानलाही विशेष काही करता आलं नाही. विराट कोहलीने मात्र एकट्याने खिंड लढवली. त्याच्या धावांचा वेग थोडा कमी राहीला. कोहलीने 19 व्या षटकात 67 चेंडूत शतक पूर्ण केलं. विराट कोहलीने नाबाद 113 धावांची केल्या. राजस्थानकडून चहलने २ बळी घेतले.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.