IPL 2025 मधील ४७ व्या सामन्यामध्ये आज राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. सामन्यामध्ये राजस्थानचा कर्णधार रियान परागने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. आता गुजरातचे खेळाडू प्रथम फलंदाजी करणार आहेत. प्लेऑफच्या हिशोबाने हा सामना राजस्थान आणि गुजरात या दोन्ही संघांसाठी महत्त्वपूर्ण आहे.
राजस्थानसाठी आता करो या मरो स्थिती आहे. राजस्थानने सलग पाच सामने गमावले आहेत. दिल्ली, लखनऊ आणि बंगळुरु यांच्या विरोधात खेळताना राजस्थानने प्रथम गोलंदाजी केली होती. या तिन्हीही सामन्यांमध्ये राजस्थानला धावांचे लक्ष गाठता आले नव्हते. सलामीवीर माघारी परतल्यानंतर मधल्या फळीतील फलंदाज सामना जिंकवून देण्यात अपयशी ठरले होते. आजच्या सामन्यातही राजस्थानने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तेव्हा आजतरी राजस्थान चेज करु शकेल का अशी शंका व्यक्त केली जात आहे.
सवाई मानसिंग स्टेडियमवर विकेट घेण्यासाठी चांगली परिस्थिती आहे, त्यामुळे गोलंदाजी करणार आहोत असे रियान परागने म्हटले. आम्ही टॉस जिंकलो असतो तर आम्हीही गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला असता असे शुबमन गिल म्हटले. दरम्यान टॉस झाल्यानंतर दोन्ही संघांची प्लेईंग ११ घोषित करण्यात आली. संजू सॅमसन दुखापतग्रस्त असल्याने वैभव सूर्यवंशीला संधी देण्यात आली आहे. फझलहक फारुकीच्या जागी महेश तिक्षणा आणि तुषार देशपांडेच्या जागी युधवीर सिंग चरकला प्लेईंग ११ मध्ये समाविष्ट करण्यात आले आहेत. गुजरातकडून करीम जनातने पदार्पण केले आहे.
राजस्थान रॉयल्सची प्लेईंग ११ -
यशस्वी जयस्वाल, वैभव सूर्यवंशी, नितीश राणा, रियान पराग (कर्णधार), ध्रुव जुरेल, शिमरॉन हिटमायर, जोफ्रा आर्चर, वनिंदू हसरंगा, संदीप शर्मा, महेश तिक्षणा, युधवीर सिंह
इम्पॅक्ट खेळाडू - शुभम दुबे, तुषार देशपांडे, कुमार कार्तिकेय, आकाश मधवाल, कुणाल राठोड
गुजरात टायटन्सची प्लेईंग ११ -
साई सुदर्शन, शुबमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर शाहरुख खान, राहुल तेवतिया, करीम जनत, राशिद खान, साई किशोर, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा
इम्पॅक्ट खेळाडू - इशांत शर्मा, महिपाल लोमरोर, अनुज रावत, अरशद खान, दशुन शनाका
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.