RR vs GT (Rajasthan Royals vs Gujrat Titans), IPL 2024 Match Weather Update twitter
Sports

RR vs GT, IPL 2024: राजस्थानमध्ये जोरदार पाऊस! केव्हा सुरु होणार RR vs GT सामना?

RR vs GT Match Updates | IPL 2024 Match News in Marathi: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.

Ankush Dhavre

RR vs GT Match Weather Update:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना जयपुरच्या सवाई मानसिंग स्डेडियमवर सुरु आहे. दरम्यान हा सामना सुरु व्हायला उशीर झाला आहे. सामन्यापूर्वीच पाऊस आल्याने या सामन्याचा नाणेफेक पुढे ढकलण्यात आला आहे. या सामन्याचा नाणेफेक ७ वाजून २५ मिनिटांनी होणार आहे. ७ वाजून ४० मिनिटांनी सामन्याला प्रारंभ होणार आहे

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ५ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्स संघाने ४ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. हे चारही सामने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. तर संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता. (Cricket world cup)

या सामन्यात गुजरात टायटन्सने नाणेफेक जिंकला असून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११:

राजस्थान रॉयल्स – यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार/विकेटकीपर), रियान पराग, ध्रुव जुरेल, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, आवेश खान,शिमरॉन हेटमायर, नवदीप सैनी, युझवेंद्र चहल

गुजरात टायटन्स – शुभमन गिल (कर्णधार), साई सुदर्शन, विजय शंकर, अभिनव मनोहर, मॅथ्यू वेड (विकेटकीपर), राहुल तेवतिया, राशिद खान, स्पेन्सर जॉन्सन, नूर अहमद, उमेश यादव, मोहित शर्मा

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan News : कल्याणमध्ये पोलिसांकडून २ वर्षांच्या मुलीवर गंभीर गुन्हा, काय आहे संपूर्ण प्रकरण? Video

Chandrashekhar Bawankule : फोन टॅपिंगनंतर आता मोबाईल सर्व्हिलन्स? बावनकुळेंच्या वक्तव्याने राज्यात खळबळ, VIDEO

Saturday Horoscope : विनाकारण कामांमध्ये येणाऱ्या अडचणीमुळे मनोबल कमी होईल; ५ राशींच्या लोकांना राहावे लागेल सावध

Maharashtra Government : राज्यात बांगलादेशी घुसखोरांना आळा बसणार; फडणवीस सरकारने उचललं मोठं पाऊल

Satara News : डॉक्टर महिलेचे आरोपीसोबत १५० हून अधिक कॉल, आत्महत्येपूर्वी काय घडलं? पोलीस तपासात महत्वाची माहिती समोर

SCROLL FOR NEXT