पॉइंट्स टेबलवर टॉपर असलेला राजस्थान रॉयल्स आणि सातव्या क्रमांकावर असलेल्या गुजरात टायटन्स यांच्यात आज भिडत होणार आहे. जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर हे दोन्ही संघ आमनेसामने येत आहेत. दोन्ही संघांसाठी हा सामना खूप महत्त्वाचा असेल. एकीकडे राजस्थानला आपली विजयी घोडदौड कायम ठेवायची आहे, तर दुसरीकडे गुजरातही सामना जिंकत पॉइंट्स टेबलवर वरती जाण्याच्या प्रयत्नात असेल. (Latest News)
राजस्थानने या हंगामात ४ सामने खेळले आहेत आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघाने ते सर्व जिंकलेत. यामुळे हा संघ पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर आहे. तर गुजरात टायटन्सने ५ सामने खेळलेत, यात त्यांना फक्त २ सामने जिंकता आलेत. गुजरातला आज विजयांची संख्या ३ वर बदलायची आहे. पण त्याआधी या दोघांमध्ये आतापर्यंत कोणत्या संघाचा वरचष्मा राहिला ते जाणून घेऊया.
राजस्थान विरुद्ध गुजरात संघाचा हेड टू हेड
आयपीएलमध्ये आतापर्यंत राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स यांच्यात ५ सामने झालेत. या ५ सामन्यांमध्ये गुजरातने ४ जिंकले आहेत, तर राजस्थानला केवळ एकच सामना जिंकता आलाय. अशा परिस्थितीमुळे पॉइंट्स टेबलवर अव्वल असलेल्या संघाला शुबमन गिलचा संघ पराभूत करण्यात यशस्वी होतो का? का राजस्थान पुन्हा विजयी पतका फडकावेल हे पाहावे लागेल.
मागील हंगामात राजस्थान आणि गुजरातदरम्यान दोन्ही संघ आमनेसामने आले होते, तेव्हा दोन्ही संघांनी एक-एक सामने जिंकलेत. पहिला सामना गुजरातने ९ विकेट राखत जिंकला होता. तर दुसऱ्या सामन्यात राजस्थानने ३ गडी राखून विजय मिळवला होता. पण त्याआधी आयपीएल २०२२ मध्ये गुजरात टायटन्सने राजस्थानविरुद्ध तीन सामने खेळले होते आणि तिन्ही सामने गुजरातने जिंकले होते.
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.