Nitish Kumar Reddy: पंजाबच्या गोलंदाजांचा घाम काढणारा नितीश कुमार रेड्डी आहे तरी कोण? हार्दिकसोबत आहे खास कनेक्शन

Who Is Nitidh Kumar Reddy: पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान झालेल्या २० वर्षीय फलंदाज नितीश कुमार रेड्डीने तुफान फटकेबाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
Who is sunrisers hyderabad 20 years old batter nitish kumar reddy know in marathi amd2000
Who is sunrisers hyderabad 20 years old batter nitish kumar reddy know in marathi amd2000twitter

Who Is Nitish Kumar Reddy:

आयपीएल २०२४ स्पर्धेत एकापेक्षा एक युवा खेळाडूंचा जलवा पाहायला मिळाला आहे. या स्पर्धेत अनेक असे युवा खेळाडू पाहायला मिळाले आहेत ज्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यादरम्यान झालेल्या २० वर्षीय फलंदाज नितीश कुमार रेड्डीने तुफान फटकेबाजी करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

सनरायझर्स हैदराबाद संघाकडून खेळणाऱ्या या फलंदाजाने ३७ चेंडूत ४ चौकार आणि ५ गगनचुंबी षटकारांच्या साहाय्याने ६४ धावांची विस्फोटक खेळी केली. पंजाबकडून चांगली गोलंदाजी करणाऱ्या हरप्रीत ब्रारच्या एकाच षटकात या पठ्ठ्याने २२ धावा कुठल्या. दरम्यान नितीश कुमार रेड्डी आहे तरी कोण? जाणून घ्या.

Who is sunrisers hyderabad 20 years old batter nitish kumar reddy know in marathi amd2000
IPL 2024: वानिंदु हसरंगाच्या रिप्लेसमेंटची घोषणा! या स्टार खेळाडूला मिळाली संधी

कोण आहे नितीश रेड्डी?

नितीश कुमार रेड्डीचा जन्म आंध्रप्रदेशमधील विशाखापट्टणममध्ये झाला. त्याला सनरायझर्स हैदराबादने २० लाखांच्या मूळ किमतीत आपल्या संघात स्थान दिलं. त्याला खरी ओळखा तेव्हा मिळाली जेव्हा तो विनू माकंड अंडर १९ क्रिकेट स्पर्धेत आंध्रप्रदेश संघासाठी तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजी करण्यासाठी आला. या स्पर्धेतही त्याचा बोलबाला पाहायला मिळाला होता. (Cricket news in marathi)

Who is sunrisers hyderabad 20 years old batter nitish kumar reddy know in marathi amd2000
IPL 2024 Points Table: चेन्नईच्या विजयानंतर गुणतालिकेचं समीकरण बदललं! तुमचा आवडता संघ कितव्या स्थानी?

बॅटिंग ऑलराऊंडर म्हणून खेळणारा नितीश रेड्डी बेन स्टोक्स आणि हार्दिक पंड्याला आपला आदर्श मानतो. त्याने रणजी ट्रॉफी २०२३-२४ हंगामात फलंदाजी करताना ७ सामन्यांमध्ये ३६६ धावा केल्या. ज्यात एक शतक आणि एक अर्धशतकी खेळीचा समावेश होता.

हैदराबादचा शानदार विजय..

या सामन्यात प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने प्रथम फलंदाजी करताना ९ गडी बाद १८२ धावा केल्या. पंजाबला हा सामना जिंकण्यासाठी १८३ धावांची गरज होती. या धावांचा पाठलाग करताना पंजाबला १८० धावा करता आल्या. हा सामना हैदराबादने २ धावांनी जिंकला

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com