PBKS vs SRH Live: हैदराबादकडून 'रेड्डी' शो तर अर्शदीपचा विकेट्सचा चौकार! पंजाबला विजयासाठी १८३ धावांचं आव्हान

PBKS vs SRH, IPL 2024: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २३ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे.
PBKS vs SRH ipl 2024 live update  arshdeep singh 4 wickets nitish kumar reddy amd2000
PBKS vs SRH ipl 2024 live update arshdeep singh 4 wickets nitish kumar reddy amd2000twitter

PBKS vs SRH, IPL Live Score:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २३ वा सामना सनरायझर्स हैदराबाद आणि पंजाब किंग्ज या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. महाराजा यदविंद्र सिंग आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात पंजाब किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाने २० षटकअखेर १८२ धावा केल्या आहेत.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या सनरायझर्स हैदराबाद संघाला हवी तशी सुरुवात करता आली नाही. ट्रेविस हेड २१ आणि अभिषेक शर्मा १६ धावा करत माघारी परतला. एडन मार्करम तर शून्यावर बाद होऊन माघारी परतला. मात्र त्यानंतर फलंदाजीला आलेला नितीश कुमार रेड्डी हा सनरायझर्स हैदराबाद संघासाठी ट्रम्पकार्ड ठरला. त्याने ३७ चेंडूंचा सामना करत ४ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ६४ धावांची तुफान खेळी केली. शेवटी अब्दुल समदने ५ चौकारांच्या साहाय्याने २५ धावा चोपल्या. (Cricket news in marathi)

PBKS vs SRH ipl 2024 live update  arshdeep singh 4 wickets nitish kumar reddy amd2000
IPL 2024, PBKS Vs SRH: पंजाब किंग्स हैदराबादला देणार का मात? दोन्ही संघात कोण राहिलंय वरचढ?

पंजाब किंग्ज संघातील गोलंदाजांबद्दल बोलायचं झालं तर, अर्शदीप सिंगने २९ धावा खर्च करत सर्वाधिक ४ गडी बाद केले. तर सॅम करनमे २ आणि हर्षल पटेलने २ गडी बाद केले.

या सामन्यासाठी अशी आहे दोन्ही संघांची प्लेइंग ११..

पंजाब किंग्ज – शिखर धवन (कर्णधार), जॉनी बेअरस्टो, प्रभसिमरन सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), हरप्रीत ब्रार, हर्षल पटेल, राहुल चहर, अर्शदीप सिंग, सॅम करन, सिकंदर रझा, शशांक सिंह,

PBKS vs SRH ipl 2024 live update  arshdeep singh 4 wickets nitish kumar reddy amd2000
IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?

इम्पॅक्ट प्लेअर्स – प्रभसिमरन सिंग, नॅथन एलिस, तनय त्यागराजन, राहुल चहर, ऋषी धवन

सनरायझर्स हैदराबाद – ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडन मार्करम, हेनरिक क्लासेन (विकेटकीपर), अहमद, पॅट कमिन्स (कर्णधार), भुवनेश्वर कुमार, जयदेव उनाडकट, टी नटराजन अब्दुल समद, नितीश रेड्डी, शाहबा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com