RR vs GT, Record: आज राजस्थान - गुजरात भिडणार! रॉयल्ससाठी टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड

Rajasthan Royals vs Gujarat Titans, Head To Head Record: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत
RR vs GT, Record: आज राजस्थान - गुजरात भिडणार! रॉयल्ससाठी टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड
RR vs GT Head to head record rajasthan royals vs gujarat titans record news in marathi amd2000twitter

RR vs GT, Head To Head Record:

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने येणार आहेत. हा सामना शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या गुजरात टायटन्स संघासाठी अतिशय महत्वाचा असणार आहे. कारण या संघाला चांगली सुरुवात मिळाली होती.

मात्र त्यानंतर या संघाला होम ग्राऊंडवर पराभवाचा सामना करावा लागला आहे. सध्या हा संघ ४ गुणांसह गुणतालिकेत सातव्या स्थानी आहे. तर राजस्थान रॉयल्सचा संघ या हंगामातील सर्वात यशस्वी संघ आहे.कारण या संघाने या हंगामातील सर्व सामने जिंकले आहेत. त्यामुळे हा सामना रोमांचक होण्याची दाट शक्यता आहे.

असा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड..

राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स संघातील रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ५ वेळेस आमने सामन आले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्स संघाने ४ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. मुख्य बाब म्हणजे गुजरात टायटन्स संघाने जे ४ सामने जिंकले होते.

RR vs GT, Record: आज राजस्थान - गुजरात भिडणार! रॉयल्ससाठी टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड
IPL 2024: किंग कोहलीचा Orange Cap वर कब्जा! Purple Cap कुणाच्या डोक्यावर?

त्यावेळी हार्दिक पंड्या हा गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार होता. यावेळी शुभमन गिल हा गुजरात टायटन्स संघाचा कर्णधार असणार आहे. राजस्थान संघातील फलंदाज जोस बटलर आणि कर्णधार संजू सॅमसनने शानदार खेळ करुन दाखवला आहे. त्यामुळे या सामन्यातही या फलंदाजांकडून शानदार कामगिरीची अपेक्षा असणार आहे. तर यशस्वी जयस्वालचा फॉर्म हा चिंतेचा विषय ठरतोय. (Cricket news in marathi)

RR vs GT, Record: आज राजस्थान - गुजरात भिडणार! रॉयल्ससाठी टेन्शन वाढवणारा राहिलाय रेकॉर्ड
IPL 2024: वानिंदु हसरंगाच्या रिप्लेसमेंटची घोषणा! या स्टार खेळाडूला मिळाली संधी

या सामन्यासाठी अशी असू शकते दोन्ही संघांची प्लेइंग ११..

गुजरात टायटन्स: साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), केन विलियम्सन, शरथ बीआर (यष्टीरक्षक), विजय शंकर, राहुल तेवतिया, राशिद खान, नूर अहमद, उमेश यादव, स्पेंसर जॉनसन, दर्शन नालकंडे.

इम्पॅक्ट प्लेअर- मोहित शर्मा

राजस्थान रॉयल्स: यशस्वी जयस्वाल, जोस बटलर, संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक), रियान पराग, ध्रुव जुरेल, शिमरोन हेटमायर, आर अश्विन, ट्रेंट बोल्ट, अवेश खान, नांद्रे बर्गर, युजवेंद्र चहल

इम्पॅक्ट प्लेअर: शुभम दुबे

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com