नाशिकमध्ये मालगाडीचा भयंकर अपघात, भल्या पहाटे 'मॅजिक'ला उडवले, जागीच चेंदामेंदा

Nashik train accident : नाशिकच्या मनमाड येथे पहाटेच्या सुमारास मालगाडी आणि मॅजिक गाडीचा भीषण अपघात झाला. रेल्वे रुळावर बंद पडलेल्या मॅजिक गाडीला मालगाडीने जोरदार धडक दिल्याने गाडीचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने चालक आणि सहकारी वेळेत बाहेर पडल्याने जीवितहानी टळली.
Nashik train accident
Nashik train accidentSaam
Published On

अजय सोनवणे, नाशिक प्रतिनिधी

नाशिकमधील मनमाडमध्ये मालगाडी आणि मॅजिकचा भयंकर अपघात झाला. पहाटेच्या सुमारास रेल्वे मालगाडीने मॅजिक गाडीला जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भयंकर होती की मॅजिक गाडीचा चेंदामेंदा झाला. मिळालेल्या माहितीनुसार, मनमाडच्या गर्डरशॉप येथील रेल्वे लाईनवर हा अपघात झाला. यानंतर परिसरात एकच खळबळ उडाली.

पहाटेच्या सुमारास मालवाहू रेल्वे रॅक एफसीआय धान्य गोडाऊनमध्ये जात होती. त्याच वेळी मॅजिक गाडी गर्डर शॉपमधून येत होती. पण मॅजिक गाडी रेल्वे रुळावर बंद पडली. वेगात असणाऱ्या मालगाडीने मॅजिक गाडीला उडवले. सुदैवाने यात कोणतीही जिवतहानी झाली नाही. मॅजिकमधील चालक आणि दुसरा एक व्यक्ती तात्काळ बाहेर पडले होते. पण मालगाडीच्या धडकेत गाडीचा चेंदामेंदा झाला.

Nashik train accident
IAF Sukhoi Su-30MKI : मोठी बातमी! भारताचे सुखोई विमान क्रॅश, उड्डाण घेताच 60 किमीवर अग्नितांडव

गाडी बंद पडल्याचे दिसताच रेल्वे इंजिन चालकाने गाडी थांबवली. मॅजिकमध्ये असलेल्या दोघांनी गाडी लोटून पुन्हा बाहेर आणली. रेल्वे इंजिन चालक जाण्यासाठी निघाला होता, पण अचानक मॅजिक गाडी उतारावरून पुन्हा रेल्वे रूळावर आली अन् मालगाडीला जोरात धडकली. या अपघातानंतर परिसरात एकच खळबळ उडाली होती. सुदैवाने चालक आणि त्याच्यासोबत असणारा व्यक्ती बचावला.

Nashik train accident
Pune : अध्यात्मिक शिक्षणाच्या नावावर विद्यार्थिनीचं शारीरिक शोषण, आळंदीच्या आश्रमातील धक्कादायक प्रकार

या अपघातात मॅजिक गाडीचा चेंदामेंदा झाला. सुदैवाने यात कोणालाही दुखापत झाली नाही. या अपघातामुळे मात्र गर्डर शॉप व ग्रामीण भागातून मनमाड शहरात येणाऱ्या नागरिकांचे व वाहन धारकांना ताटकळत रहावे लागले. त्यामुळे नागरिकांकडून नेहमीच संताप व्यक्त केला जात आहे.

Nashik train accident
Pune : पुण्यातील धक्कादायक घटना! दारूच्या नशेत मानसीने महिला PSI चा घेतला चावा, नेमकं काय झालं?
Nashik train accident
लेकीसाठी बाप वाघ झाला! छेडणाऱ्याला कॉलेजमध्ये तुडवले, पुण्यातील नामांकित महाविद्यालयातील प्रकार

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com