IAF Fighter Jet Crash in Assam: भारतीय वायुसेनेचं सुखोई Su-30MKI हे लढाऊ विमान कोसळल्यामुळे मोठा अपघात झाला आहे. आसाममधील कार्बी आंगलोंग जिल्ह्यात हवाई दलाचे सुखोई विमान काल रात्री रडारवरून अचाक गायब झाले होते. चोखीहोलानंतर विमान बेपत्ता झाल्याचे समोर आले होते. पण ताज्या अपडेटनुसार हे विमान कोसळले. सुखोई विमानाचा पायलट देखील बेपत्ता असल्याचं समोर आले आहे. त्याचा शोध घेतला जात आहे.
स्थानिक अधिकाऱ्याने दिलेल्या माहतीनुसार, गुरूवारी सायंकाळी सुखोई Su-30MKI या विमानाने उड्डाण घेतले, त्यानंतर काही मिनिटातच रडारावरून गायब झाले. त्याचा जमिनीवरील नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. विमानाशी शेवटचा संपर्क संध्याकाळी ७:४२ वाजता नोंदवण्यात आला होता, त्यानंतर तो रडारवरून गायब झाले. आता हे विमान कोसळल्याची माहिती समोर आली आहे. विमानातील बेपत्ता पायलटचा घेण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर केला जात आहे. आसाममध्ये मोठ्या प्रमाणात शोध आणि बचाव कार्य सुरू आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुखोई Su-30MKI विमानाने जोरहाट हवाई तळावरून उड्डाण केले होते. पण त्यानंतर काही वेळातच त्याचा संपर्क तुटला. विमानाशी शेवटचा संपर्क गुरूवारी संध्याकाळी ७:४२ च्या सुमारास झाला होता. त्यानंतर संपर्क होऊ शकला नाही, विमान कोसळल्याची भीती व्यक्त केली जात आहे. कार्बी आंगलोंग येथील रणखोलन गावातील स्थानिकांनी सायंकाळी ७:५० च्या सुमारास कोला हिलजवळ मोठा स्फोटासारखा आवाज ऐकल्याचे सांगितले. मोठ्या आवाजानंतर त्यांना आगीचा मोठा गोळा उठताना दिसला. आजूबाजूच्या गावांमध्ये त्यामुळे भीतीचे वातावरण पसरले होते. काही जणांकडून याबाबत पोलीस आणि प्रशासनाला माहिती दिली होती.
विमानाचा स्फोट झालेले ठिकाण कार्बी आंगलोंग जिल्ह्यातील रंगखोलान भागातील दुर्गम डोंगराळ भाग असल्याची माहिती मिळत आहे. हा भाग घनदाट जंगलांनी आणि उंच टेकड्यांनी वेढलेला आहे. त्यामुळे बचाव आणि मदत कार्य कठीण होत आहे. संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनुसार, घटनेनंतर लष्कर आणि हवाई दलाच्या पथके घटनास्थळी रवाना करण्यात आली आहेत. हेलिकॉप्टरने पायलटचा शोध घेतला जात आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.