RR vs GT, IPL 2024 Match Player Saam Digital
Sports

RR vs GT Match Winner: राजस्थानचा विजयरथ गुजरातने रोखला; रोमहर्षक सामन्यात राशिद खानने विजय खेचून आणला

Gujarat Titans Won Aginst Rajasthan Royals in IPL 2024 Match: जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स झालेल्या रोमहर्षक सामन्यात गुजरातने ३ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला.

Sandeep Gawade

RR vs GT 1st Inning Update

जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स झालेल्या रोमहर्षक सामन्यात गुजरातने ३ गडी राखून राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. सलग ४ सामने जिंकून गुणतालिकेत अव्वल स्थानी पोहोचलेल्या राजस्थानचा विजयीरथ गुजरातने रोखला. प्रथम फलंदाजी करताना राजस्थानने 196 धावा केल्या, प्रत्युत्तरात गुजरातने शेवटच्या चेंडूवर विजय चौकार ठोकून विजय मिळवला आहे. शेवटच्या षटकात गुजरातला 15 धावांची गरज होती. राशिद खानने शेवटच्या चेंडूवर चौकार मारून गुजरातला विजय मिळवून दिला. राजस्थानकडून आवेश खान शेवटचं षटक टाकत होता, मात्र तेवतिया आणि राशिद खानला त्याला रोखता आलं नाही.

गुजरातच्या विजयात कर्णधार शुभमन गिलचे महत्त्वाचे योगदान राहिलं. त्याने 44 चेंडूत 72 धावा केल्या. मात्र, अखेरच्या षटकांमध्ये राहुल तेवतिया आणि रशीद खान यांनी अप्रतिम फटकेबाजी करत गुजरातचा विजय निश्चित केला. तेवतियाने 11 चेंडूत 22 धावांची खेळी केली, तर रशीदने 11 चेंडूत नाबाद 24 धावा केल्या.

गुजरात टायटन्स आणि राजस्थान रॉयल्स या दोन्ही संघांमधील हेड टू हेड रेकॉर्ड पाहिला, तर दोन्ही संघ ५ वेळेस आमने सामने आले आहेत. यादरम्यान गुजरात टायटन्स संघाने ४ सामने जिंकले आहेत. तर राजस्थान रॉयल्स संघाला केवळ १ सामना जिंकता आला आहे. हे चारही सामने हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली जिंकले होते. तर संजू सॅमसन हा राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार होता.

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २४ वा सामना राजस्थान रॉयल्स आणि गुजरात टायटन्स या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. हा सामना जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियममध्ये सुरू आहे. हा सामना सुरू होण्यापूर्वी पावसाचं आगमन झालं होतं. त्यामुळे सामन्याला उशीर झाला. दरम्यान सामना सुरू होण्यापूर्वी पावसाच्या हलक्या सरी बरसल्या, तर सामना सुरू झाल्यानंतर राजस्थानच्या फलंदाजांनी धावांचा पाऊस पाडला. या सामन्यातील पहिल्या डावात राजस्थान रॉयल्स संघाने २० षटकांमध्ये ३ गडी बाद १९६ धावा करत गुजरातसमोर विजयासाठी १९७ धावांचं आव्हान ठेवलं होतं.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बाहुबली फेम प्रसिद्ध कलाकाराचं निधन; मुलगा ऑस्कर विजेता, सिनेसृष्टी शोकसागरात बुडाली | Bahubali

Maharashtra Live News Update : भंडारा जिल्हा प्रशासनाकडून शाळांना आज आणि उद्या सुट्टी; हवामान विभागाकडून रेड अलर्ट

Beed News: बीडमध्ये रस्ता पाहणीदरम्यान ट्रक खड्ड्यात कोसळला|VIDEO

Shahapur News : टॉयलेटमध्ये रक्त आढळलं, विद्यार्थिनींची विवस्त्र करून तपासणी केली; शहापूरच्या इंग्लिश मीडियम शाळेतील प्रकार

शहापूरमध्ये शाळकरी मुलींना विवस्त्र करून मारहाण; पालकांचा एकच संताप, नेमकं काय घडलं? VIDEO

SCROLL FOR NEXT