Heart blockage percentage: रिपोर्टमध्ये 70-80% ब्लॉकेज दिसले म्हणजे हार्ट अटॅक येणार? हृदयात किती टक्के ब्लॉकेज धोकादायक?

Heart blockage symptoms: एंजियोग्राफी रिपोर्टमध्ये 30, 50, 70 किंवा 80 टक्के ब्लॉकेज दिसल्यास त्याचा अर्थ काय? ब्लॉकेजची टक्केवारी किती महत्त्वाची आहे, ती कमी होऊ शकते का आणि एंजियोप्लास्टी किंवा बायपासची गरज कधी भासते ते जाणून घ्या.
Heart blockage percentage
Heart blockage percentageSAAM TV
Published On

हृदयाशी संबंधित आजार एका दिवसात होत नाहीत. शरीरात काही बदल हळूहळू होत जातात आणि त्याचा परिणाम पुढे तुमच्या हृदयावर होऊ शकतो. सुरुवातीला याची लक्षणंही फारशी जाणवत नाहीत. त्यामुळे अनेक वर्षे एखाद्या व्यक्तीला आपल्या हृदयाच्या समस्या आहेत हे कळतही नाही.

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमध्ये चरबी साचल्यामुळे ब्लॉकेज होण्यास सुरुवात होऊ शकते. काही दिवसांनी हे ब्लॉकेज वाढू शकतात. एंजियोग्राफी केल्यानंतर रिपोर्टमध्ये हे ब्लॉकेज किती टक्के आहे हे नमूद केलं जाते. मात्र रिपोर्टमध्ये दिसणारी ही आकडेवारी पाहून लगेच घाबरण्याची गरज नाही असं SAAOL Heart Center च्या एका व्हिडिओमध्ये डॉ, बिमल छाझर यांनी सांगितलंय.

30%, 50% आणि त्यापेक्षा जास्त ब्लॉकेज म्हणजे काय?

हृदयाच्या रक्तवाहिन्यांमधील ब्लॉकेज वेगवेगळ्या पातळ्यांमध्ये समजून घेतले जाते. साधारण 30 टक्क्यांपर्यंतचे ब्लॉकेज हे कमी तर सुमारे 50 टक्के ब्लॉकेज हे मध्यम मानले जातात. त्यापेक्षा जास्त ब्लॉकेज असल्यास ते गंभीर स्वरूपाचं असू शकतं.

Heart blockage percentage
Heart attack prevention: हार्ट अटॅक येण्यापासून टाळायचाय? आजपासूनच बंद करा 'या' चुका; 14 गोष्टींवर ठेवा नियंत्रण

डॉ. छाझर यांनी सांगितलंय की, ब्लॉकेज 50 टक्क्यांपेक्षा जास्त झाल्यावर रक्तवाहिनीच्या आतील भागावर म्हणजेच इंटिमावर परिणाम होण्याची शक्यता वाढू शकते.

70-80% ब्लॉकेज असतील तर?

एंजियोग्राफी केल्यानंतर रिपोर्टमध्ये 70 किंवा 80 टक्के ब्लॉकेज असल्याचं दिसलं की, अनेक रुग्ण घाबरतात. एवढे ब्लॉकेज आहे म्हणजे आता कधीही हार्ट अटॅक येऊ शकतो, असे त्यांना वाटते. मात्र केवळ रिपोर्टमधील टक्केवारी पाहून असा निष्कर्ष काढणं योग्य नाही.

तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार, एंजियोग्राफीमध्ये दिसणारी ब्लॉकेजची टक्केवारी ही प्रत्येक वेळी अगदी अचूक असेलच असं नाही. अनेकदा ती डॉक्टरांच्या निरीक्षणावर आणि अंदाजावर आधारित असू शकते. फक्त ब्लॉकेज किती टक्के आहे हे पाहून घाबरण्याची गरज नाही. हार्ट अटॅक नेमका कधी येईल हे आधीच ठरवता येत नाही. त्यामुळे रिपोर्टमध्ये ब्लॉकेजची संख्या जास्त दिसली म्हणून लगेच हार्ट अटॅक येणार आहे, असा अर्थ काढू नये.

हार्टमधील ब्लॉकेज कमी होऊ शकतात का?

हार्टमध्ये एकदा ब्लॉकेज झाल्यानंतर ते कायमचेच राहतात असं अनेकांना वाटतं. मात्र हे योग्य नाही. योग्य जीवनशैलीतील बदल आणि योग्य पद्धतीने केलेल्या उपचारांच्या प्रोटोकॉलमुळे काही रुग्णांमध्ये ब्लॉकेज कमी होण्याची किंवा काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता असू शकते.

Heart blockage percentage
High cholesterol: हाय कोलेस्ट्रॉल शरीरात वाढतंय? डोळ्यांपासून पायांपर्यंत दिसणारे हे 7 संकेत अजिबात दुर्लक्षित करू नका

फक्त एंजियोप्लास्टी किंवा बायपास हाच पर्याय आहे का?

हार्टमध्ये ब्लॉकेज आढळल्यानंतर एंजियोप्लास्टी किंवा बायपास हेच एकमेव पर्याय आहे असं नाही. ब्लॉकेज का झाले, त्यामागची कारणं कोणती आहेत आणि ती पुढे वाढू नयेत यासाठी काय करता येईल, याकडेही लक्ष देणं महत्त्वाचं आहे.

खाण्यापिण्याच्या सवयी, जीवनशैली आणि हृदयाच्या आजाराचा धोका वाढवणाऱ्या इतर कारणांमध्ये योग्य बदल केल्यास आजार पुढे वाढण्याचा धोका कमी करण्यासाठी मदत होऊ शकते. याचा अर्थ असा नाही की, एंजियोप्लास्टी किंवा बायपासची गरज कधीच भासत नाही. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते. त्यामुळे कोणता उपचार करायचा, हे रुग्णाची तपासणी आणि वैद्यकीय स्थिती पाहून डॉक्टर ठरवतात.

Heart blockage percentage
Heart attack prevention: हार्ट अटॅक येण्यापासून टाळायचाय? आजपासूनच बंद करा 'या' चुका; 14 गोष्टींवर ठेवा नियंत्रण

टीप : ही माहिती सर्वसाधारण माहितीसाठी आहे. कोणताही वैद्यकीय सल्ला घेण्यापूर्वी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com