महाराष्ट्र विधान परिषदेच्या औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासह राज्यातील पदवीधर व शिक्षक मतदारसंघांच्या द्वैवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम भारत निवडणूक आयोगाने जाहीर केला असून, औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी ८ ते सायंकाळी ४ या वेळेत मतदान होणार आहे.
खेड तालुक्यातील गाडकवाडी गावात अचानक ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने ओढे-नाले दुथडी भरून वाहू लागले… रस्त्यावरचं पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिकांचं नुकसान झालं असून, शेती आणि नव्याने लागवड केलेल्या कांदा पिकालाही फटका बसला आहे.
कळवा स्थानकात तांत्रिक बिघाड झाल्यामुळे मध्य रेल्वेची लोकल सेवा खोळंबली आहे. सीएसएमटीवरून कल्याणला जाणाऱ्या लोकलचे वेळापत्रक बिघडले आहे. अनेक लोकल १० ते १५ मिनिटे उशिराने धावत आहेत.
परराज्यात नोंदणी असलेल्या लक्झरी बस महाराष्ट्रात तसेच महाराष्ट्रातून इतर राज्यांत प्रवासी वाहतूक करताना नियमांचे पालन करतात किंवा नाही, याची तपासणी करण्यासाठी प्रादेशिक परिवहन कार्यालय, पिंपरी-चिंचवड यांच्या वतीने विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दोषी आढळलेल्या ६६ लक्झरी बसवर मोटार वाहन कायदा व संबंधित नियमांनुसार दंडात्मक कारवाई करण्यात आली.
गडचिरोलीच्या अतिदुर्गम भामरागड तालुक्यात प्रशासनाने थेट गावपातळीवर पोहोचत नागरिकांशी संवाद साधला. लष्कर आणि गोपणार या दुर्गम गावांना जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक आणि मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट देत स्थानिक समस्या जाणून घेतल्या. यावेळी विविध विकासकामांची पाहणी करण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांना वनहक्काचे ७/१२ उतारे आणि प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत घरांच्या चाव्यांचे वाटप करण्यात आले.
पुणे
जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यातील सासवड येथे दमदार पावसाची हजेरीली 22 सप्टेंबर रोजी असता सायंकाळी पाच वाजता हजेरी लावली ते सायंकाळी सहा पर्यंत दमदार पाऊस पडत होता विजांचा कडकडाट व वादळी वाऱ्यासह पावसाच्या हजेरी.. दमदार पावसामुळे शेतकरी
पुणे स्टेशन परिसरात बी. जे. मेडीकल कॉलेज ससून हॉस्पिटलच्या आवारातील पाण्याची टाकी पाडताना काही भाग अंगावर पडून गंभीर जखमी झालेल्या कामगाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.सुरेश शंकर शिंदे (वय ४५, रा. माळशिरस, सोलापूर) असे या कामगाराचे नाव आहे. कामगारांना सुरक्षिततेची साधने न पुरवल्याप्रकरणी ठेकेदारावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी वसंत शिंदे (वय ३५) यांनी बंडगार्डन पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. बी. जे. मेडिकल कॉलेज ससून हॉस्पिटलच्या आवारातील पाण्याची टाकी पाडताना बुधवारी सप्टेंबरला मध्यरात्री दीडच्या सुमारास हा अपघात घडला होता.
उल्हासनगर महानगरपालिकेतील सात स्वीकृत नगरसेवकांच्या निवडीसाठी आज अर्ज दाखल करण्यात आले. २४ सप्टेंबर रोजी विशेष महासभेत या निवडीची प्रक्रिया होणार आहे.
अर्ज दाखल करण्यासाठी शिवसेना, भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेत मोठी गर्दी केली होती. यावेळी कार्यकर्त्यांकडून जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आयुक्त कार्यालयात अर्ज दाखल करण्यासाठी जाताना काही वेळ धक्काबुक्कीची परिस्थितीही निर्माण झाली.
भाजपकडून चार, शिवसेनेकडून सहा, तर इतर पक्षांकडूनही अर्ज दाखल झाल्याची माहिती आहे. सात जागांसाठी १५ हून अधिक अर्ज आल्याने आता २४ सप्टेंबरच्या विशेष महासभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. *आता कोणत्या सात जणांची स्वीकृत नगरसेवक म्हणून निवड होते, हे २४ सप्टेंबरलाच स्पष्ट होणार आहे.*
मंत्र्यांना शेतकऱ्यांच्या बांधावर जाऊन पंचनामे आणि पाहणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. शिवसेनेचे प्रत्येक मंत्री ग्राऊंड झिरोवर उतरले पाहिजेत असे मंत्र्यांना आदेश दिलेत.
गोंदिया जिल्ह्यातील देवरी शहरात आज आदिवासी समाजाच्या वतीने भव्य मोर्चा काढण्यात आला.... विविध 22 मागण्यांसाठी आदिवासी महिला, विद्यार्थी आणि नागरिक हजारो संख्येने या मोर्चात सहभागी झाले होते.... मोर्चाने देवरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक देत प्रशासनाला मागण्यांचे निवेदन सादर केले.... आदिवासी आश्रमशाळा व वसतिगृहांची व्यवस्था TRTI मार्फत करण्यात यावी, आदिवासी जमिनींच्या हस्तांतरणाची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, आदिवासी आरक्षणाचे संरक्षण करावे, अधिसंख्य केलेली अनुसूचित जमातीची पदे भरावीत, तसेच वनहक्क आणि शेतजमिनीशी संबंधित प्रश्न सोडवावेत, अशा प्रमुख मागण्या आंदोलकांनी केल्या... यासोबतच आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांना मूलभूत सुविधा, शैक्षणिक साहित्य आणि निवासाची व्यवस्था मिळावी,परप्रांतीय मुला मुलींना महाराष्ट्रातील वसतिगृहात प्रवेश नाकारावा.... आदिवासी विद्यार्थ्यांना वसतिगृहात सरसकट प्रवेश द्यावा, आदिवासी शेतकऱ्यांना कर्जमाफी द्यावी आणि आदिवासी महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणीही करण्यात आली... यावेळी विविध मागण्यांचे निवेदन देवरीच्या उपविभागीय अधिकारी यांना सादर करण्यात आले.... मागण्यांवर शासन आणि प्रशासनाने तातडीने कार्यवाही करावी, अशी भूमिका आंदोलकांनी व्यक्त केली......
दुष्काळी परिस्थिती असताना प्रशासनाचे आणि लोकप्रतिनिधींचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी संघटनेने चिखली येथे अनोख्या पद्धतीने ‘भीक मांगो’ आंदोलन केले. आंदोलनादरम्यान जमा झालेली चिल्लर रक्कम तसेच काजू-बदाम तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्री यांना पाठवण्यात आले.
जिल्ह्यात दुष्काळाची गंभीर परिस्थिती असताना पालकमंत्री जिल्ह्यातून गायब असल्याचा आरोप करत आंदोलकांनी प्रशासनाचा निषेध केला.
अनेक दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अखेर श्रीरामपूर शहर परिसरात हजेरी लावली.
पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. शहरातील विविध भागांत पावसाच्या सरी बरसल्या, त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला. मात्र, शहरात पाऊस पडला असला तरी ग्रामीण भागात अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.
राज्यात सध्या मुख्यमंत्री आणि मंत्र्यांचे दुष्काळ पाहणी दौरे सुरू आहेत. उद्या मुख्यमंत्री लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मात्र, या दौऱ्यावरील खर्च टाळून तो निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी वापरावा, आणि कोरडा दुष्काळ जाहीर करावा,अशी मागणी छावा संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.
मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या मालमत्ता आणि आर्थिक व्यवहारांच्या चौकशीची मागणी आता थेट आयकर विभागाच्या दारात पोहोचली आहे. मनोज जरांगे यांचे जुने सहकारी अमोल खुणे यांनी ईडी कार्यालयात तक्रार देत जरांगे यांच्या सहकाऱ्यांच्या संपत्तीची चौकशी करण्याची मागणी केली होती.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक शिक्षणमहर्षी पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील यांच्या १३९ व्या जयंतीनिमित्त आज साताऱ्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाची सुरुवात साताऱ्यातील रयत शिक्षण संस्थेच्या सर्व शाळा व महाविद्यालयांच्या भव्य रॅलीने झाली हजारो विद्यार्थ्यांनी शहरातून फेरी काढण्यात आली.
अंधेरी मेट्रो स्टेशनबाहेर भटक्या कुत्र्याने एका लॉ विद्यार्थ्यावर अचानक हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात विद्यार्थ्याच्या चेहऱ्यासह डोळ्याला दुखापत झाली असून मित्राने त्याला तातडीने कूपर रुग्णालयात दाखल केले.
प्राथमिक उपचारानंतर पुढील उपचारांसाठी त्याला जे. जे. रुग्णालयात हलवण्यात आले. डोळा आणि चेहऱ्याच्या संवेदनशील भागांची तज्ज्ञांकडून तपासणी सुरू असून बहुशाखीय वैद्यकीय टीमकडून उपचार केले जात आहेत. विद्यार्थी सध्या डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे.
ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या नगरसेविका आणि मुंबईच्या माजी महापौर विशाखा राऊत यांच्या प्रकरणात सुप्रीम कोर्टाने तात्पुरता दिलासा दिल्याची माहिती आहे. राऊत यांच्या ओबीसी जात प्रमाणपत्राच्या वैधतेवरून त्यांच्या नगरसेवकपदावर झालेल्या कारवाईला आव्हान देणाऱ्या याचिकेवर न्यायालयाने नोटीस बजावली आहे.
तसेच निवडणूक आयोग आणि त्यांच्या प्रतिस्पर्धी प्रिया सरवणकर गुरव यांनाही नोटीस बजावण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राऊत यांनी यापूर्वी भूषवलेल्या नगरसेवकपदाची जागा सध्या रिक्त ठेवू नये, असे निर्देश देण्यात आल्याची माहिती आहे. प्रलंबित अपिलावर इतर कोणत्याही बाबींच्या प्रभावाखाली न येता निर्णय घ्यावा, असेही न्यायालयाने स्पष्ट केले असल्याचे वृत्त आहे.
हिंगोलीच्या कळमनुरी तालुक्यातील सेल्सुरा गावात सरकारच्या कर्जमाफी योजनेच्या अंमलबजावणीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. सुमारे १,६०० लोकसंख्या असलेल्या या गावातील ४०० शेतकरी बँकांच्या थकबाकीदारांच्या यादीत होते; मात्र त्यापैकी केवळ १०० शेतकऱ्यांचाच कर्जमाफीच्या यादीत समावेश झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
अनेक शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण होऊनही बँकांना कर्जमाफीची रक्कम अद्याप प्राप्त झालेली नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, एका अल्पभूधारक शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर कर्जमाफीच्या अंमलबजावणीचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ कधी मिळणार, असा सवाल उपस्थित केला जात आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील चिखलीचे माजी काँग्रेस आमदार राहुल बोंद्रे यांनी भाजपमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय मागे घेत काँग्रेसमध्येच राहण्याचा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांच्याशी झालेल्या फोनवरील संवादानंतर बोंद्रे यांनी आपली भूमिका बदलली. या घडामोडीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी मध्यस्थी केल्याचे वृत्त आहे. बोंद्रे यांच्या निर्णयानंतर जिल्ह्यातील काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांकडून या भूमिकेचे स्वागत करण्यात येत असून कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे सांगण्यात येत आहे.
कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या खिद्रापूर शाखेत 40 लाख रुपयांचा कथित भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत व्हायरल ऑडिओ क्लिपवरून आता राजकीय वातावरण तापलं आहे. शिवसेनेचे उपनेते संजय पवार यांनी मंत्री हसन मुश्रीफ यांना कडक शब्दांत सुनावलं आहे. खिद्रापूर शाखेतील 40 लाखांच्या भ्रष्टाचाराची चर्चा सुरू असून, “मुश्रीफ साहेब, तुम्ही काय करताय?” असा थेट सवाल संजय पवार यांनी केला. जिल्हा मध्यवर्ती बँकेला लागलेल्या ‘घुशींचा’ तातडीने बंदोबस्त करा, शाखेतील संबंधित कर्मचारी आणि एमडींवर कारवाई करा, तसेच पोलिस अधीक्षकांकडे तक्रार करून निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी त्यांनी केली. संजय पवार यांनी केली.
साईच्या मृत्यूनंतर पवई IIT कॅम्पसमध्ये संतापाचे वातावरण असून सकाळपासून IITच्या मुख्य गेटबाहेर मुंबई पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांकडून या घटनेच्या पार्श्वभूमीवर मोर्चा काढण्यात येत असून, IIT कॅम्पसमधील प्राध्यापकांनीही काल मोर्चा काढला होता. विद्यार्थ्यांनी केलेल्या विविध मागण्यांपैकी सिलिंग फॅनऐवजी वॉल फॅन बसवण्याची मागणी प्रशासनाकडून मान्य करण्यात आली असून, लवकरच वॉल फॅन बसवण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.
जळगावच्या भडगाव परिसरात ८०० रुपयांच्या पैशांच्या वादातून आत्ते भावाने मामे भावाचा खून केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. धर्मा जुगा पवार असे मृताचे, तर जुगा कांतिलाल पवार असे संशयित आरोपीचे नाव आहे.
दोघेही गावोगावी जाऊन बनावट रुद्राक्ष विकण्याचे काम करत होते. धर्मा पवार याने रुद्राक्ष विकून मिळवलेल्या ८०० रुपयांवरून दोघांमध्ये दारू पीत असताना वाद झाला. त्यानंतर आरोपीने दगडाने मारहाण केल्याने धर्मा पवार याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत आरोपीला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे. आरोपीच्या बॅगेत मृताचे दात आणि दोन जिवंत कबुतरे आढळल्याची माहितीही समोर आली आहे.
धुळे जिल्ह्यात सप्टेंबर महिना संपत आला तरी समाधानकारक पाऊस झालेला नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे संकट उभे राहिले आहे. पावसाअभावी पहिली पेरणी वाया गेली असून दुबार पेरणीचीही शाश्वती नसल्याने बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला आहे.
या पार्श्वभूमीवर संपूर्ण धुळे जिल्हा तातडीने दुष्काळग्रस्त घोषित करावा आणि पिकांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करावेत, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेनेने जिल्हाधिकारी कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना निवेदन दिले. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पंचनामे न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे.
केंद्राच्या मदतीसाठी न थांबता राज्य सरकार मदत करणार
केवळ दुष्काळ घोषित करून होत नाही, उपाययोजना कराव्या लागतात- मुख्यमंत्री
दुष्काळाच्या मुद्द्यावर बैठकीत चर्चा झाली
जनावरांचा चारा आणि पिण्याच्या पाण्यावर अधिक लक्ष देणार
माहिती मिळालेल्या ठिकाणी दुष्काळाची उपाययोजना सुरु
७-८ महिने काढायचे असल्याने पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणार
एटापल्ली तालुक्यातील कन्हाळगाव ते कारका हा अंदाजे चार किलोमीटरचा रस्ता अद्याप कागदावरच असल्याने ग्रामस्थांना पावसाळ्यात चिखल आणि जंगलातील पायवाटेतून जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. ग्रामपंचायत जवेली बु. अंतर्गत येणाऱ्या या मार्गावर साप-विंचू, घसरगुंडी आणि चिखलामुळे नागरिकांच्या अडचणी वाढल्या असून गरोदर महिला, विद्यार्थी आणि वृद्धांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. गावकऱ्यांनी CPIचे सहसचिव सचिन मोतकुरवार यांच्याकडे समस्या मांडत तातडीने माती-मुरूम रस्त्याला मंजुरी देण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने दखल घेऊन रस्त्याचे काम सुरू न केल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा CPIकडून देण्यात आला आहे.
भुसावळ तालुक्यातील एमआयडीसी परिसरातील एन.आर.जे. फार्मा या केमिकल कंपनीला सोमवारी मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. केमिकलमुळे आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण करत शेजारील ट्रान्सफार्मर कंपनीलाही आपल्या कवेत घेतले. आगीची माहिती मिळताच भुसावळ, जळगाव, वरणगाव, दीपनगर आणि वरणगाव फॅक्टरीच्या अग्निशमन दलांनी घटनास्थळी धाव घेत संयुक्तपणे शर्थीचे प्रयत्न केले. अथक प्रयत्नांनंतर अखेर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. या भीषण आगीत दोन्ही कंपन्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी संगमनेर येथे जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. निवेदन स्वीकारण्यासाठी प्रांत अधिकारी उपस्थित न राहिल्याने आंदोलक शेतकरी आक्रमक झाले. यावेळी संतप्त शेतकऱ्याने प्रांत अधिकाऱ्यांची खुर्ची फेकल्याने कार्यालयात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना तातडीने मदत द्यावी, ही मोर्चाची प्रमुख मागणी होती.
कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का
2.4 रिश्टर स्केल तीव्रता
जमिनीच्या खाली पाच किलोमीटर खोल केंद्रबिंदू
भूकंपाच्या धक्क्याने परिसरामध्ये भीतीच वातावरण
धाराशिव मधील दुष्काळाची दाहकता,सोयाबीन करपुन गेल्याने शेतकऱ्यांचे आर्थीक गणीत कोलमडले
चार एकरातील सोयाबीन काढणीला 12 हजार खर्च,उत्पन्न मिळणार अवघे 10 हजाराचे
सरकारने आमच्याकडे लक्ष द्यावे, कोरडा दुष्काळ जाहीर करावा - शेतकऱ्यांची मागणी
वाशिमच्या माळेगाव ग्रामपंचायतला आग....
आगीत ग्रामपंचायत मधील महत्त्वाची कागदपत्रं आणि इतर साहित्य जळाल्याची माहिती...
माळेगाव ग्रामपंचायतीमध्ये लाखो रुपयांच्या अपव्यवहाराची होणार होती चौकशी
राज्यातील शिक्षक आणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुका जाहीर....
अमरावती शिक्षक मतदार संघात भाजपकडून श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे संचालक हेमंत काळमेघ, खासदार अनिल बोंडे यांच्या भगिनी संगीता शिंदे आणि शेखर भोयर यांचे नाव चर्चेत...
कर्जतमध्ये सराफ दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न
व्यापाऱ्याच्या जागरूकतेने चोरी टळली, चोर फरार
मराठवाड्यामध्ये कोरड्या दुष्काळाची दाहकता वाढली आहे
मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यात 15 दिवसात तब्बल पाच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक आकडेवारी पुढे आली आहे
जळगावातील धरणगाव येथे गणरायाच्या विसर्जन मिरवणुकीत दुष्काळ जाहीर करण्याचे फलक
शिवसेना उद्धव ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकी दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणी संदर्भात फलक घेऊन लक्ष वेधले
विसर्जन मिरवणुकीत शेतकऱ्यांच्या ज्वलंत प्रश्नांवर लक्ष वेधत शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करण्याची मागणी
संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात आक्रोश मोर्चा...
तालुक्यात झालेला विजेचा खेळखंडोबा...
धरणातून पाण्याचे आवर्तन सुरू असताना विज नसल्याने शेतीपिके धोक्यात..
शहापूर -
अंगावर वीज पडून एकाचा मृत्यू
काल सायंकाळच्या सुमारास शहापूरमध्ये मुसळाधार पाऊस झाला
यावेळी वादळी वाऱ्यासह विजांचा कडकडाट देखील झाला
रोहित बबन मेंगाळ वय 20 वर्ष यांच्या अंगावर विज पडून मृत्यू झाला.
शहापूर तालुक्यातील लेनाड ग्रामपंचायतीतील कुंभारपाडा येथील तो रहिवासी होता
नाशिक जिल्ह्यातील अनेक शेतकरी गणेशोत्सव पूर्वी झेंडू फुल शेतीचे उत्पादन घेतात
सुरवातीला गणेशोत्सवात फुलांची मागणी असते त्यानंतर नवरात्र, दिवाळीपर्यंत फुले बाजारात विक्रीला येत असतात
यंदा नाशिक जिल्ह्याच्या अनेक तालुक्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे
अशा परिस्थितीत अनेक शेतकऱ्यांनी उपलब्ध पाण्यावर झेंडू फुल शेतीचे उत्पादन घेतले
मात्र सध्या या फुलांना जिल्ह्यातील बाजार पेठे सह गुजरात राज्यात मागणी नसून फुलाला अवघा 5 ते 7 रुपये किलोचा दर मिळत आहे
पावसाअभावी डोळ्यांसमोर पिक करपलं, पदरात काहीच पडल नाही, जालन्यात हताश शेतकऱ्याने सोयाबीनच्या शेतात सोडल्या मेंढ्या
जालन्यात दीड महिन्यांहून अधिक पावसाचा खंड, चार लाख हेक्टरहून अधिक सोयाबीन कपाशी करपले, कृषी विभागाचा प्राथमिक अंदाज...
जिल्ह्यात दीड महिन्याहून अधिक पावसाचा खंड पडल्याने बळीराजा संकटात, सोयाबीनला शेंगा न लागल्यामुळे शेतकऱ्याने थेट सोयाबीनच्या शेतात सोडल्या मेंढ्या....
लातूर -
साखर कारखानदाराच्या दारात शेतकऱ्यांचा ठिय्या
८ महिन्यांपासून ऊस बिल थकीत
दुष्काळाने होरपळलेल्या शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ
धाराशिव -
तुळजापूरचे भाजप आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि ठाकरे गटाचे नेते आमदार आंबदास दानवे यांच्यातील वाद आता चांगलाच पेटला
भाजपच्या कार्यकर्त्याकडून अंबादास दानवे यांच्या फोटोला जोडो मारो तर ठाकरे च्या कार्यकर्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकात अंबादास दानवे यांच्या फोटोला केला दुग्धाभिषेक
अंबादास दानवे व राणाजगजितसिंह पाटील यांच्या आव्हान प्रती आव्हानानंतर कार्यकर्ते रस्त्यावर उतरले
वाशिम -
वाशिमच्या रिसोड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या आडोळ प्रकल्पात या पावसाळ्यात अपेक्षित पाऊस न झाल्याने सध्या प्रकल्पात केवळ ३० टक्के पाणीसाठा शिल्लक आहे.
गेल्या दीड महिन्यापासून पावसाने दडी मारल्याने आगामी काळातील पाणीपुरवठ्याचं नियोजन करण्याचं मोठं आव्हान नगर परिषदेसमोर आहे.
त्यामुळे आतापासूनच पाण्याची बचत आणि उपलब्ध पाणीसाठ्याचं काटेकोर नियोजन करणं गरजेचं आहे.
मात्र, दुसरीकडे शहरातील अनेक भागात दररोज हजारो लिटर पाणी वाया जात असल्याचं चित्र आहे.
त्यामुळे पाणीगळती रोखण्यासाठी नगर परिषद प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
यवतमाळात डाॅल्बी, प्लाझ्मा-प्रेशर मिड साउंड सिस्टिमवर बंदी
यवतमाळ जिल्ह्यात ध्वनी प्रदूषणाला आळा घालण्यासाठी जिल्हाधिकारी विकास मीना यांनी प्रतिबंधात्मक अधिसूचना जाहीरी केली असून त्यानुसार डॉल्बी साऊंड सिस्टिम, टॉप- मिड बेस अशा मल्टी स्पीकर सिस्टीम,प्लाझ्मा साऊंड सिस्टिम, प्रेशर मिड साऊंड तसेच अशा साऊंड सिस्टिम साठी बदल (माॅडिफाय) केलेल्या वाहनांचा वापरावर निर्बंध घालण्यात आले आहेत हे निर्बंध अधिसूचना प्रसिद्ध झाल्यापासून एक नोव्हेंबर पर्यंत लागू राहणार आहे.
अमरावती -
अमरावतीत घनकचरा वाहतुकीची १०० वाहने बेपत्ता; कोणार्क कंपनीची राजापेठ पोलिसांत धाव
मनपाच्या घनकचरा व्यवस्थापनावर परिणामाची शक्यता; पोलिसांकडून कंपनीकडे कागदपत्रांची मागणी
अँकर : अमरावती महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन व वाहतूक कार्यासाठी वापरण्यात येणारी तब्बल १०० वाहने अचानक बेपत्ता झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे
याप्रकरणी कोणार्क कंपनीने राजापेठ पोलीस ठाण्यात पत्र देऊन तक्रार नोंदवल्याने मनपा वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे
नांदेड -
दुष्काळ आढावा बैठकीत काजू-बदाम खाल्ल्याच्या टीकेनंतर आता आमदार दुष्काळ परिस्थितीची पाहणी करण्यासाठी थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहोचले आहे.
नांदेडमध्ये कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांच्या उपस्थितीत दुष्काळ परिस्थितीचा आढावा घेण्यात आला होता.
या आढावा बैठकीमध्ये लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांनी काजू-बदामावर ताव मारला होता.
धाराशिव:
नशामुक्त धाराशिवसाठी लोकचळवळ,गावोगावी जाऊन जनजागृती
ड्रग्जसह व्यसनाच्या आहारी गेलेल्या तरुणांना व्यसनातून बाहेर काढण्यासाठी लेझीम पथकातुन जनजागृती
पहील्या टप्प्यात गणेशोत्सवानिमित्त कळंब तालुक्यातील 132 गावात वर्षेभर राबवण्यात येतोय उपक्रम
अमरावती -
50 टक्के कर्ज वितरित करू हा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने घेतलेला ठराव नियमबाह्य, हा ठराव वापस घेण्यास सांगू
चंद्रशेखर बावनकुळे यांची मोठी प्रतिक्रिया...
अमरावती जिल्हा मध्यवर्ती बँकेंन जो निर्णय घेतला की शेतकऱ्यांना 50 टक्केच कर्ज देऊ तो निर्णय आम्ही मागे घेण्याची त्यांना सांगितले आहे
शेतकऱ्यांना 50 टक्केच कर्ज देऊ असा ठराव घेता येत नाही 100 टक्के कर्ज जिल्हा बँकेने दिले पाहिजे हे महत्त्वाचं आहे.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.