शेंगदाणे सालीसकट खावेत की साल काढून? जाणून घ्या आरोग्यासाठी कोणते आहे अधिक फायदेशीर

Manasvi Choudhary

शेंगदाणे

पौष्टिक शेंगदाणे खायला लहानांपासून मोठ्यापर्यंत सर्वांनाच आवडतात. आपल्यापैकी अनेकजण शेंगदाणे भाजून, उकडून किंवा सॅलड आणि उसळीमध्ये मिक्स करून खातात.

Peanuts With Skin or Without: Which Is Healthier | yandex

पौष्टिक शेंगदाणे

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला प्रथिने, जीवनसत्त्वे आणि खनिजे यासांरखी पौष्टिक घटके मिळतात. मात्र, शेंगदाणे खाताना अनेकांच्या मनात नेहमीच एक प्रश्न पडतो की, शेंगदाणे सालीसकट की साल काढून खावेत.

Peanuts With Skin or Without: Which Is Healthier | yandex

शेंगदाणाच्या सालीचे फायदे

शेंगदाण्याभोवतीलालसर आणि तपकिरी रंगाची पातळ साल असते जी आरोग्यासाठी फायदेशीर मानली जाते. शेंगदाणाच्या सालीमध्ये पॉलीफेनॉल आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे शरीरातील पेशींचे रक्षण करतात. यामुळे शेंगदाणे सालीसकट खाणे अत्यंत फायदेशीर मानले जाते.

Peanut | yandex

पचनक्रिया सुधारते आणि बद्धकोष्ठता दूर होते

जर तुम्हाला पोटाचा किंवा पचनाचा त्रास असेल, तर शेंगदाणा सालीसकट खाणे अत्यंत फायदेशीर ठरते. शेंगदाण्याच्या सालीमध्ये उच्च दर्जाचे फायबर असते. हे खाल्ल्याने पोट बराच वेळ भरल्यासारखे राहते, ज्यामुळे वारंवार भूक लागण्याची सवय सुटते.

What is in Peanut Skin? | yandex

शेंगदाणे खाल्ल्याने शरीराला मिळते उर्जा

अनेकजण उपवासाला देखील ऊर्जा मिळवण्यासाठी सालीसकट शेंगदाणे किंवा त्याचा शिरा आवर्जून खातात.

What is in Peanut Skin? | yandex

शेंगदाणे कसे खावेत?

आरोग्याच्या दृष्टीने विचार केल्यास, शेंगदाणे नेहमी सालीसकट खाणे अधिक फायदेशीर ठरते. कारण साल काढल्यामुळे त्यातील अनेक महत्त्वाचे अँटीऑक्सिडंट्स आणि फायबर निघून जातात.

What is in Peanut Skin? | yandex

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

NEXT: Salt Water Cleaning: मिठाच्या पाण्याने लादी पुसण्याचे फायदे काय?

Salt Water Cleaning
येथे क्लिक करा...