Manasvi Choudhary
घराची स्वच्छता राखणे अत्यंत महत्वाचे आहे. अनेकजण घरांमध्ये पाण्यात मीठ मिसळून लादी पुसतात.
वास्तुशास्त्रात, मिठाच्या पाण्याने लादी पुसण्याचे फायदे सांगितले आहेत. ते या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार मिठामधील गुणधर्म वातावरणातील आणि घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करतात आणि सकारात्मक उर्जा देतात.
मिठाच्या पाण्यामध्ये नैसर्गिक अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-फंगल गुणधर्म असतात. यामुळे जमिनीवरील सूक्ष्म जंतू,बॅक्टेरिया आणि दुर्गंधी कमी होते आणि घर स्वच्छ होते.
घरामध्ये मुंग्या, झुरळे किंवा इतर लहान कीटक असतील तर मिठाच्या पाण्याने लादी पुसल्यामुळे ते कमी होतात.
घरातील अनेक लहान-सहान वास्तू दोष किंवा बाधा दूर करण्यासाठी आठवड्यातून किमान एकदा तरी मिठाच्या पाण्याने लादी पुसणे शुभ मानले जाते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.