Satara Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का, घाबरून नागरिक घराबाहेर पळाले

Koyna Dam Area Earthquake: साताऱ्याच्या कोयना धरण परिसरात भूकंपाचा धक्का जाणवला. आज सकाळी अचानक भूकंपाचा धक्का बसल्याने नागरिक प्रचंड घाबरले आणि घराबाहेर पळाले.

सातारा जिल्हा भूकंपाच्या धक्क्याने हादरला. सातारा जिल्ह्यातला कोयना धरण परिसराला भूकंपाचा धक्का बसलेला आहे. भकंपाची तीव्रता २.४ रजिस्टर स्केल इतकी होती. जमिनीच्या खाली ५ किलोमीटर खोल या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. या भूकंपाच्या धक्क्यामुळे आसपासच्या परिसरात राहणारे गावकरी प्रचंड घाबरले.

भूकंपाच्या धक्क्याने परिसरामध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालेले आहे. कोयना धरण सुरक्षित आहे. सकाळच्या सुमारास हा भूकंपाचा धक्का जाणवला. भूकंपाचा धक्का जाणवल्यानंतर नागरिकांनी घराबाहेर धाव घेतली. १९६७ साली झालेल्या महाप्रलयंकारी भूकंपामुळे याच परिसरात शेकडो नागरिकांचा जीव गेला होता. आज बसलेल्या भूकंपाच्या धक्क्याने १९६७ सालच्या आठवणी ताज्या झाल्या.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com