RCB vs DC IPL 2024 
Sports

RCB vs DC: पाटीदारचं दमदार अर्धशतक; RCBनं दिल्लीसमोर ठेवलं १८८ धावांचे लक्ष्य

RCB vs DC IPL 2024: आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होत आहेत. दुसरा सामना सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होत आहे.

Bharat Jadhav

आयपीएलमध्ये आज डबल हेडर सामने होत आहेत. दुसरा सामना सामना दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू यांच्यात होत आहे. हा सामना एम चिन्नास्वामी स्टेडियमवर खेळला जातोय. दिल्ली कॅपिटल्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. फलंदाजीचं आमंत्रण मिळाल्यानंतर आरसीबीने २० षटकात १८७ धावा करत दिल्लीसमोर १८८ धावांचे आव्हान ठेवलं आहे.

आरसीबीकडून सर्वाधिक धावा रजत पाटीदारने केल्या. त्याने ३२ चेंडूत अर्धशतक झळकावले. यात ३ चौकार आणि ६ षटकार ठोकत त्याने वैयक्तिक ५२ धावा केल्या. त्यानंतर विल जॅक्सने २९ चेंडूत ३ चौकार आणि ४ षटकाराच्या मदतीने वैयक्तीक ४१ धावा केल्यात. त्यानंतर कॅमरन ग्रीनने २४ चेंडूत ३२ धावा करत नाबाद राहिलाय. दरम्यान या सामन्यात विराट कोहली आणि फाप डु प्लेसी हे अपयशी ठरलेत. कोहलीला फक्त २७ धावा करता आल्या. दिल्लीच्या संघाकडून गोलंदाजी करताना खलील अहमद आणि रसिख सलामने दोन-दोन विकेट घेतल्या. तर इशांत शर्मा, मुकेश कुमार आणि कुलदीप यादवला एक-एक विकेट मिळाली.

दोन्ही संघांचे प्लेइंग-११

रॉयल चॅलेंजर्स बंगलोर: फाफ डू प्लेसिस (कर्णधार), विराट कोहली, विल जॅक, रजत पाटीदार, कॅमेरॉन ग्रीन, महिपाल लोमरोर, दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक), कर्ण शर्मा, मोहम्मद सिराज, लॉकी फर्ग्युसन, यश दयाल.

दिल्ली कॅपिटल्स: जेक फ्रेझर मॅकगर्क, अभिषेक पोरेल (यष्टीरक्षक), शाई होप, कुमार कुशाग्रा, ट्रिस्टन स्टब्स, अक्षर पटेल (कर्णधार), कुलदीप यादव, रसिक दार सलाम, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : नांदेडमध्ये 70 ते 75 जणांतून पाण्यातून विषबाधा

Pakistan Airstrikes : पाकिस्तानचा पुन्हा एअरस्ट्राईक, खेळाडूंवर टाकले बॉम्ब, ८ अफगाण खेळाडूंचा मृत्यू

ST Buses : टेस्लावाल्या नेत्यांनो जरा एसटीकडेही लक्ष द्या, लाल परीची दयनीय अवस्था

Nashik : आता शत्रूची खैर नाही! नाशिकचं स्वदेशी तेजस, पाकिस्तानला धडकी

Dhanteras 2025: आज धनत्रयोदशी आणि शुभ ग्रहयोग! खरेदी, गुंतवणूक आणि भाग्य उघडण्यासाठी सर्वोत्तम दिवस

SCROLL FOR NEXT