FAF DU plessis twitter
क्रीडा

IPL 2025, Mega Auction: फाफ डू प्लेसिसला डच्चू? या खेळाडूंना घेण्यासाठी RCB पाडू शकते पैशांचा पाऊस

Royal Challenger Bengaluru, IPL 2025: आगामी आयपीएल २०२५ स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात घेऊ शकतो, जाणून घ्या.

Ankush Dhavre

IPL 2025 Auction: आयपीएल २०२५ स्पर्धेपूर्वी मेगा ऑक्शन होणार आहे. या ऑक्शनपूर्वी ३१ ऑक्टोबरपर्यंत सर्व संघांना आपल्या रिटेन केलेल्या खेळाडूंची नावं जाहीर करावी लागणार आहे. रॉयल चॅलेंजर्सं बंगळुरुचा संघ विराट कोहलीला सोडणार नाही, ही काळ्या दगडावरची रेग आहे.

तर दुसरीकडे फाफ डू प्लेसीसला कर्णधार म्हणून कायम ठेवायचं की, रिलीझ करायचं? असा प्रश्न रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुसमोर असणार आहे. दरम्यान जर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने फाफ डू प्लेसिसला रिलीज केलं, तर हा संघ कोणत्या खेळाडूंना आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतो? जाणून घ्या.

इशान किशन -

आगामी हंगामासाठी मुंबई इंडियन्सचा संघ रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह, सूर्यकुमार यादव आणि हार्दिक पंड्याला रिटेन करु शकतो. त्यामुळे इशान किशनला रिलीज केले जाऊ शकते. असे झाल्यास इशान किशनही ऑक्शनमध्ये असेल. इशान किशन सलामीला फलंदाजी करण्यासह यष्टीरक्षणही करेल. त्यामुळे यष्टीरक्षक फलंदाजाची जागा भरुन निघेल.

क्विंटन डी कॉक

दक्षिण आफ्रिकेचा आक्रमक यष्टीरक्षक फलंदाज क्विंटन डी कॉकला आयपीएल स्पर्धेत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, दिल्ली कॅपिटल्स, राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्सकडून खेळण्याचा अनुभव आहे. टी-२० क्रिकेटमध्ये क्विंटन डी कॉकचा रेकॉर्ड दमदार राहिला आहे. क्विंटन डी कॉक देखील सलामीला फलंदाजीला येऊन संघाला आक्रमक सुरुवात करुन देऊ शकतो. यासह तो उत्तम यष्टीरक्षक देखील आहे. त्यामुळे तो यष्टीरक्षक फलंदाजाची जागा भरुन काढू शकतो.

केएल राहुल

केएल राहुल गेल्या २ हंगामांपासून लखनऊ सुपरजायंट्स संघाचा कर्णधार आहे. मात्र यावेळी तो या संघाचं नेतृत्व करणार की नाही, हे अजूनही स्पष्ट झालेलं नाही. लखनऊचा संघ त्याला रिटेन करणार की नाही, हे देखील स्पष्ट झालेलं नाही. त्यामुळे असं म्हटलं जात आहे की, केएल राहुल ऑक्शनमध्ये येऊ शकतो. असं झाल्यास रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ त्याला आपल्या संघात घेण्यासाठी जोर लावू शकतो.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Parbhani News : मराठा आरक्षणासाठी तरुणाने संपविले जीवन; परभणीच्या जिंतूर तालुक्यातील घटना

Maharashtra Exit Poll: मोर्शीमध्ये भाजपचे उमेश यावलकर होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Bhandara News : धरणाच्या प्रवाहात मासेमारी करताना बुडून मृत्यू; मृतदेह वीज निर्मिती कार्यालयात नेट नातेवाईकांचा गोंधळ

Chanakya Niti: आजपासून स्वत:ला लावा या सवयी, पैशाची चणचण कायमची सुटेल

Maharashtra Exit Poll : कराड उत्तर विधानसभा मतदारसंघाचे संभाव्य आमदार कोण? पाहा Exit Poll

SCROLL FOR NEXT