RCB Team Saam Tv
Sports

IPL 2026: आयपीएल सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट विश्वात हाहाकार; चॅम्पियन RCB चा संघ १६,७०० कोटींना विकला

Royal Challengers Bangalore Sold: आयपीएल २०२६ सुरू होण्यापूर्वी आरसीबी संघाने इतिहास रचला आहे. आरसीबी सर्वात महागडा संघ ठरला आहे. हा संघ तब्बल १६,७०० कोटींना विकला गेला.

Priya More

Summary -

  • आरसीबी संघ १६,७०६ कोटींना विकला गेला

  • आदित्य बिर्ला ग्रुपच्या नेतृत्वाखाली नवीन मालकी

  • आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा व्यवहार

  • IPL 2026 नंतर मालकी बदल लागू होणार

राजस्थान रॉयल्सच्या पाठोपाठ रॉयल चॅलेंजर्स बंगळूर फ्रँचायझीचीही विक्री झाली आहे. आदित्य बिर्ला ग्रुप, द टाइम्स ऑफ इंडिया ग्रुप, बोल्ट व्हेंचर्स आणि ब्लॅकस्टोनच्या पर्पेच्युअल प्रायव्हेट इक्विटी स्ट्रॅटेजी यांनी संयुक्तपणे रॉयल चॅलेंजर्स बंगळूरची खरेदी केली. १६,७०६ कोटी रुपयांना हा संघ विकला गेला. या व्यवहारानंतर आता आरसीबीचे चेअरमन आदित्य बिर्ला ग्रुपचे डायरेक्टर आर्यमन विक्रम बिर्ला असणार आहेत. आरसीबीला पूर्वी संघाची मालकी असलेल्या डायजिओ या बलाढ्य कंपनीचा एक विभाग असलेल्या युनायटेड स्पिरिट्स लिमिटेडकडून विकत घेण्यात आले.

या कराराला अद्याप बीसीसीआय आणि आयपीएलच्या नियामक परिषदेची मंजुरी मिळणे बाकी आहे. आयपीएल २०२६ च्या सीझननंतर, आदित्य बिर्ला ग्रुपचे आर्यमन विक्रम बिर्ला हे आरसीबीचे नवीन अध्यक्ष होतील, तर टाइम्स ग्रुपचे सत्यन गजवानी उपाध्यक्षपदाची धुरा सांभाळतील. आरसीबीला विकत घेणारे आर्यमन बिर्ला हे क्रिकेटर आहे. ते जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेटर आहेत. या व्यवहारामुळे आयपीएल २०२६ सुरू होण्याआधी आरसीबी संघ इतिहासातील सर्वात महागडा संघ ठरला आहे.

आरसीबी विकत घेण्यासाठी जगभरातील प्रमुख व्यावसायिक शर्यतीत होते. यामध्ये सीरम इन्स्टिट्यूटचे मालक असलेले आदर पूनावाला, मणिपाल हॉस्पिटल्सचे मालक असलेले रंजन पै, मँचेस्टर युनायटेडचे ​​मालक असलेले ग्लेझर कुटुंब आणि टेमासेकसारख्या प्रमुख गुंतवणूक कंपन्यांचा समावेश होता. आरसीबीच्या आधी राजस्थान रॉयल्स संघाचाही लिलाव झाला होता. राजस्थान रॉयल्स संघाला कल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील एका समूहाने १५,३०० कोटी रुपयांना विकत घेतले.

२००८ मध्ये युनायटेड स्पिरिट्सने आरसीबीला अंदाजे ₹४८५ कोटी रुपयांना विकत घेतले. २०२३ मध्ये आरसीबीने डब्ल्यूपीएलमधील महिला संघ ९०१ कोटींना विकत घेतला. २०२४ मध्ये महिला संघाने विजेतेपद पटकावले आणि २०२५ मध्ये आरसीबीच्या पुरुष संघाने १७ वर्षांची प्रतीक्षा संपवून आपले पहिले आयपीएल विजेतेपद जिंकून इतिहास रचला. आरसीबीच्या यशात विराट कोहलीचा मोठा वाटा आहे. २०१३ मध्ये विराट कोहली आरसीबीचा कॅप्टन झाला होता तेव्हापासून हा संघ लोकप्रिय आहे. या संघाला पहिले विजेतेपद मिळवण्यासाठी १७ वर्षे लागली असली तरी चाहत्यांचे प्रेम कायम आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणात आता शासकीय अधिकारी अडचणीत

Supreme Court: धर्मांतरीतांना सर्वोच्च दणका! धर्मांतरण केलं आरक्षण विसरा, धर्मांतरीत आता लाभापासून वंचित

Ashok Kharat Case: सुनिल तटकरे, चाकणकरांची 'अनामिका' वादात; 'गाडीच्या दारात बोट चेपल्याने जखम'

Pune : मोठी बातमी! पुण्याला मिळाला ४ पदरी उन्नत महामार्ग, तळेगाव-चाकणची वाहतूककोंडी कायमची संपणार

Government Schemes : राज्यातील 'ही' योजना बंद झाली का? दीड वर्षांपासून लाभच नाही, नेमकी स्थिती काय?

SCROLL FOR NEXT