माझ्याबाबतचा शेवटचा निर्णय बीसीसीआय घेईल; दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरची पहिली प्रतिक्रिया

Gautam Gambhir : दक्षिण आफ्रिकेविरुद्ध लाजीरवाण्या पराभवानंतर गौतम गंभीरन पहिली प्रतिक्रिया दिली आहे. माझ्याबाबतचा शेवटचा निर्णय बीसीसीआय घेईल, असेही त्याने सांगितले.
Gautam Gambhir news
Gautam Gambhir Saam tv
Published On
Summary

दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभवानंतर गौतम गंभीरनं स्वीकारली जबाबदारी

माझ्याबाबत पुढील निर्णय बीसीसीआय घेईल, असं गंभीरनं सांगितलं

एका खेळाडूला दोष देणं चुकीचं , असं त्याने म्हटलं.

दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात लाजीरवाण्या पराभवानंतर टीम इंडियाचा कोच गौतम गंभीरवर टीका होऊ लागली आहे. दक्षिण आफ्रिकेच्या विरोधातील कसोटी सामन्यात ०-२ ने पराभवानंतर हेड कोच गौतम गंभीरने पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्याने विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.

गौतमी गंभीरला कसोटी क्रिकेटमध्ये हेड कोच पदासाठी योग्य व्यक्ती आहे का, हे त्याला विचारण्यात आले. त्यावेळी गौतम गंभीर म्हणाला, पराभवासाठी कोणताही एक खेळाडू किंवा कोणत्याही एका खराब शॉटसाठी जबाबदार ठरवणे योग्य नाही. या पराभवाची जबाबदारी माझ्यापासून सुरु होते. मी पराभवानंतर कोणत्याही खेळाडूला जबाबदार ठरवलं नाही. या पुढे देखील करणार नाही'.

गंभीरने दक्षिण आफ्रिकेकडून ०-२ ने पराभव झाल्यानंतर प्रतिक्रिया देताना पुढे म्हटलं की, 'पराभवाचा दोष सर्वांचा आहे. याची सुरुवात माझ्यापासून सुरु होते. आम्हाला चांगला खेळ दाखवायचा आहे. पहिल्या डावात आमची धावसंख्या एक गडी गमावून धावसंख्या ९५ इतकी होती. मात्र, ७ गडी गमावल्यानंतर धावसंख्या १२२ इतकी झाली. हे स्वीकारण्यासारखं नाही. मात्र, तुम्ही एक व्यक्ती किंवा एका शॉटला दोष देऊ शकत नाही'.

गंभीरच्या नेतृत्वात भारताने १८ कसोटी सामन्यापैकी १० सामन्यात पराभवाला सामोरे जावं लागलं आहे. मागील वर्षी न्यूझीलंड आणि यंदा दक्षिण आफ्रिकेच्या विरोधात टीम टेस्ट क्रिकेटमध्ये पराभवाला सामोरे जावं लागलं आहे.

Gautam Gambhir news
Dilip Walse Patil : माझं राजकीय वजन कमी झालंय; दिलीप वळसे पाटील असं का म्हणाले?

टेस्ट क्रिकेट खेळण्यासाठी अत्यंत दिमाखदार आणि प्रतिभावान क्रिकेटपटूंची गरज नाही, असेही त्याने सांगितले.तर आम्हाला कौशल्ये आणि मजबूत मानसिकता असलेले हवेत, तेच चांगले क्रिकेटपटू होतात, असेही गंभीरने सांगितले.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com