Manasvi Choudhary
वाहन सुरळीत चालण्यासाठी इंजिन ऑइल महत्वाचे असते. वाहनामध्ये इंजिन ऑइल हे ब्लडसारखं काम करते. मात्र वाहनामध्ये इंजिन ऑइल वेळेवर न बदलल्यास वाहनाचे इंजिन ऑइल आतून खराब होते.
तुमच्या वाहनामधील इंजिन ऑइल खराब झालं आहे? हे ओळखण्याच्या सोप्या टिप्स या वेबस्टोरीतून जाणून घ्या.
इंजिन ऑइलमुळे इंजिमधील छोटे पार्ट्स सुरळीत कम करतात. कचरा साचू देत नाही. इंजिन तापण्यापासून वाचवते.
वाहनामध्ये मिनरल ऑइल वापरत असाल तर दर ३००० ते ५००० किलोमीटरवर ते बदलणे महत्वाचे आहे.
जर तुम्ही आधुनिक सिन्थेटिक ऑइल वापरत असाल तर ते ७००० ते १०००० किलोमीटरवर ६ महिने ते १ वर्ष पूर्ण झाल्यावर बदलणे महत्वाचे आहे.
याकडे दुर्लक्ष केल्यास धोक्याचे संकेत मिळते.
ऑइल खराब झाल्यास लुब्रिकेशन कमी होते, ज्यामुळे इंजिनचे पार्ट्स एकमेकांवर घासला जाऊन मोठा आवाज किंवा खडखड आवाज येऊ लागतो.
कार किंवा बाईकच्या डॅशबोर्डवर ऑइल कॅनच्या आकाराची वॉर्निंग लाईट सतत किंवा वारंवार सुरू होत असेल, तर ते ऑइल कमी झाल्याचे किंवा खराब झाल्याचे संकेत असते.
नवीन ऑइल हे स्वच्छ, सोनेरी किंवा पिवळसर रंगाचे असते. जर ऑइल गडद काळे, तपकिरी, चिकट किंवा अत्यंत घट्ट झाले असेल, तर ते लगेच बदलणं अनिवार्य
जर सायलेन्सरमधून काळा किंवा पांढरट दाट धूर बाहेर येत असेल, तर ते इंजिन ऑइल जळत असल्याचे प्रमुख लक्षण आहे.