IPL ची फायनल कोण जिंकणार? पंजाब किंग्ज आणि आरसीबी आमनेसामने, 18 वर्षांनी नवा इतिहास घडणार

IPL RCB Vs PBKS : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जमध्ये आयपीएलची फायनल होणार आहे. या सामन्यात कोण जिंकणार? आयपीएलच्या 18 वर्षांच्या इतिहासात कोणता नवा रेकॉर्ड रचला जाणार आहे. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून..
IPL RCB Vs PBKS  :
IPL RCB Vs PBKSsaam tv
Published On

सुप्रिम मसकर, साम प्रतिनिधी

आयपीएल 2025 आता अंतिम टप्प्यावर येऊन ठेपलीय. मुंबई इंडियन्स आणि पंजाब किंग्स यांच्यात झालेला क्वालिफायर-2 चा सामना क्रिकेटप्रेमींची उत्सुकता शिगेला पोहचवणारा ठरला. मुंबई विरुद्ध पंजाब सामन्याचा टॉस झाल्यावर पावसानं खोडा घातला. त्यानंतर झालेल्या सामन्यात पंजाब किंग्जनं मुंबई इंडियन्सचा 5 गडी राखून दारुण पराभव केला.

श्रेयस अय्यरने 27 चेंडूत दमदार अर्धशतक ठोकलं..दुसरीकडे रोहित शर्मा,बुमराह आणि बोल्ट चमकदार कामगिरी करु शकले नाही. आता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि पंजाब किंग्जमध्ये फायनल होणार आहे.. विशेष म्हणजे दोन्ही संघांनी आजपर्यंत कधीही विजेतेपद पटकावलेलं नाही...त्यामुळे यंदा IPLला नवे चॅम्पियन मिळणार आहे.

IPL RCB Vs PBKS  :
IPL 2025 फायनलपूर्वी विराट कोहलीला जोरदार धक्का, बंगळुरू पोलिसांनी केली मोठी कारवाई

IPLचा नवा चॅम्पियन कोण?

पंजाब किंग्ज आणि आरसीबी सामना रंगणार

गुजरातच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर सामना

18 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच IPL ला नवा विजेता मिळणार

संध्याकाळी 7.30 वाजता सामना सुरु होणार

पावासचा व्यत्यय आल्यास रिझर्व्ह डेचा नियम लागू

रिझर्व्ह डे नुसार सामना 4 जून रोजी खेळवला जाईल

IPL RCB Vs PBKS  :
MI Vs PBKS : मुंबई इंडियन्सची ती एक चूक अन् सामना पंजाबच्या बाजूने फिरला, मैदानाबाहेर आणि मैदानात नेमकं काय घडलं?

दुसऱ्य़ांदा संधी मिळालेल्या पंजाब किंग्जची सगळी मदार श्रेय़स अय्यर, प्रियांश आर्या आणि प्रभसिमरन सिंग यांच्यावर असणार आहे. तर आरसीबीची मदार किंग कोहली आणि रजत पाटीदारवर असणार आहे. त्यामुळे फायनलमध्ये कुणाची बॅट तडपणार आणि कोण आपल्या टीमला पहिलं वहिलं विजेतेपद मिळवून देणार याकडे साऱ्या क्रिकेटप्रेमींचं लक्ष लागलंय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com