ICC ने बुधवारी ताजी रँकिंग जाहीर केलंय. यामध्ये वनडे रँकिंगमध्ये रोहित शर्माने पुन्हा अव्वल स्थान गाठलंय. तर दुसऱ्या क्रमांकावर विराट कोहलीने स्थान पटकावलंय. याशिवाय टेस्ट क्रिकेटमधील गोलंदाजींमध्ये टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत पहिल्या क्रमांकावर आहे. तर या क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क आहे.
विराट कोहली एप्रिल 2021 पासून ODI रँकिंमध्ये पहिल्या क्रमांकावर नव्हता. त्यावेळी पाकिस्तानच्या बाबर आझमने त्याला मागे टाकलं होतं. मात्र आता कोहली पुन्हा पहिल्या स्थानाच्या अगदी जवळ पोहोचलाय. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध झालेल्या तीन सामन्यांच्या ODI सिरीजमध्ये त्याने उत्तम कामगिरी केली.
37 वर्षीय कोहलीने तीन सामन्यांत एकूण 302 रन्स केलेत. यावेळी त्याला ‘प्लेअर ऑफ द सीरीज’ घोषित करण्यात आलं. त्याच्या या कामगिरीचा परिणाम ICC च्या रँकिंगमध्ये दिसला. यावेळी तो दोन क्रमांक थेट पुढे गेला आहे. आता कोहलीच्या पुढे फक्त रोहित शर्मा आहे.
रोहितने या सिरीजमध्ये 146 रन्स केलेत. त्याच्या या कामगिरीनंतर त्याने आयसीसी रँकिंगमध्ये पहिलं स्थान पटकावलं आहे. विशाखापट्टणममध्ये खेळलेल्या शेवटच्या सामन्यात कोहलीने नाबाद 65 रन्स केले आणि आता तो रोहितपेक्षा फक्त 8 रेटिंग पॉइंट्सनी मागे आहे.
भारत आता पुढचा वनडे सामना 11 जानेवारीपासून न्यूझीलंडविरुद्ध खेळणार आहे. ३ सामन्यांची ही वनडे सिरीज असणार आहे. या काळात सर्वांचे लक्ष रोहित शर्मा आणि विराट कोहलीकडे असेल कारण ODI फलंदाजांच्या क्रमांक 1 रँकिंगसाठी दोघांमध्ये स्पर्धा रंगणार आहे.
केवळ रोहित आणि कोहली नाही तर या आठवड्यात जाहीर झालेल्या नवीन रँकिंगमध्ये इतर भारतीय खेळाडूंनीही मोठी झेप घेतली आहे. विकेटकीपर–फलंदाज केएल राहुल दोन पॉईंट्स पुढे आला असून तो 12व्या क्रमांकावर पोहोचलाय. गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये डावखुरा फिरकीपटू कुलदीप यादव खेळाडूंना मागे टाकून थेट तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला.
टेस्ट गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये ऑस्ट्रेलियाचा मिचेल स्टार्क मोठी झेप घेत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या दोन एशेज टेस्टमध्ये सलग ‘प्लेअर ऑफ द मॅच’ ठरल्यानंतर त्याने हे स्थान पटकावलं आहे. इंग्लंडच्या फलंदाजांच्या खराब कामगिरीचा परिणाम टेस्ट रँकिंगवरही झाला आहे. हॅरी ब्रूकची घसरण झाली असून तो चौथ्या क्रमांकावर पोहोचला. केन विलियम्सन आणि स्टीव्ह स्मिथ प्रत्येकी एक स्थान पुढे गेलेत.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.