IPL 2026: BCCI च्या आधी कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय; कुठे होणार सामने, जाणून घ्या
आयपीएल 2026 साठी अजून बीसीसीआयने कोणतंही अधिकृत वेळापत्रक जाहीर केलेलं नाहीये. मात्र कर्नाटक सरकारने यावेळी बेंगळुरूच्या चाहत्यांना दिलासा दिलाय. राज्याचे उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी स्पष्ट केलंय की एम. चिन्नास्वामी स्टेडियममध्ये पुढील सिझनमधील आयपीएल सामने आयोजित केले जातील. गेल्या सिझनमध्ये गर्दीच्या घटनेनंतर स्टेडियमच्या सुरक्षेवर सतत प्रश्न उपस्थित केलं जातं होतं.
कर्नाटक सरकारचा मोठा निर्णय
रविवारी कर्नाटक राज्य क्रिकेट संघटनेच्या (KSCA) निवडणुकीत मतदान करण्यासाठी पोहोचलेल्या उपमुख्यमंत्री डी.के. शिवकुमार यांनी माध्यमांशी संवाद साधला. त्यांनी सांगितलं की, राज्य सरकार कोणत्याही परिस्थितीत आयपीएलला बेंगळुरूपासून बाहेर जाणार नाही.
त्यांनी स्पष्ट केलं की, “आम्ही IPL दुसऱ्या ठिकाणी हलवणार नाही. चिन्नास्वामी स्टेडियम हे कर्नाटकाचा अभिमान आहे आणि सामने इथेच होतील.” त्यांच्या या विधानाने हे स्पष्ट झालंय की, बेंगळुरू IPL 2026 मध्येही आपले होम व्हेन्यू कायम ठेवेल.
RCB च्या विजयानंतर घडली दुर्घटना
गेल्या सिझनमध्ये RCB ने इतिहास रचत आपला पहिला IPL किताब जिंकला होता. टीमच्या विजयावर बेंगळुरूमध्ये मोठा जल्लोष झाला. मात्र या आनंदावर लगेच विरजण पडलं. कारण चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर आयोजित विजय मिरवणुकीदरम्यान चेंगराचेंगरी झाली. आणि यामध्ये तब्बल 11 लोकांचा मृत्यू झाला तर सुमारे 50 चाहते जखमी झाले.
या दुर्घनटनेनंतर स्टेडियमच्या सुरक्षेची व्यवस्था आणि गर्दी व्यवस्थापनावर गंभीर प्रश्न उपस्थित झालं. इतकेच नाही तर बीसीसीआयने या अपघातानंतर या मैदानावर कोणताही मोठा आंतरराष्ट्रीय सामना किंवा स्पर्धा ठेवली नाही. महिला वर्ल्ड कपचे सामनेही बेंगळुरूपासून हटवून इतर शहरांत खेळवले गेले.
RCB नवीन होम ग्राउंड शोधतंय?
सोशल मीडिया आणि काही रिपोर्ट्समध्ये दावा करण्यात आला होता की, RCB मॅनेजमेंट पुण्याला संभाव्य होम ग्राउंड म्हणून पाहतंय जेणेकरून भविष्यात कोणत्याही प्रकारचा वाद होणार नाही. मात्र राज्य सरकारच्या ताज्या चित्र स्पष्ट झालंय की RCB बंगळुरूपासून कुठेही जाणार नाही.
बीसीसीआयकडे सर्वांचे लक्ष
येत्या काही आठवड्यांत IPL 2026 चं अधिकृत वेळापत्रक जाहीर करणार आहे. पण कर्नाटक सरकारच्या या घोषणेनंतर हे जवळपास निश्चित झालंय की, बेंगळुरूचे चाहते पुन्हा एकदा आपल्या घरच्या मैदानावर RCB चे सामने पाहू शकतील.
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

