rohit sharma saam tv
Sports

Dinesh Lad: रोहित शर्माने WTC अन् WC ही जिंकावा! कोच दिनेश लाड यांचं विठूरायाला साकडं- VIDEO

Rohit Sharma Childhood Coach: भारतीय संघाला टी-२० वर्ल्डकप जिंकून देणाऱ्या रोहित शर्माच्या बालपणीच्या प्रशिक्षकांनी रोहितने वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा व्यक्त केली आहे.

Ankush Dhavre

रोहितकडून एकच अपेक्षा आहे, त्याने भारतीय संघासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकावा अशी इच्छा रोहितचे बालपणीचे प्रशिक्षक दिनेश लाड यांनी व्यक्त केली आहे. द्रोणाचार्य जीवनगौरव पुरस्कार’ प्राप्त दिनेश लाड यांनी साम टीव्हीशी बोलताना ही इच्छा व्यक्त केली आहे.

रोहितला क्रिकेटपटू म्हणून घडविण्यात दिनेश लाड यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. त्याला स्वामी विवेकानंद आंतरराष्ट्रीय शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी दिनेश लाड यांनी त्याला स्कॉलरशिप मिळवून दिली होती. यासह ऑफ स्पिन गोलंदाजी ते विस्फोटक फलंदाजीचा गुरुमंत्र देण्यातही गुरु दिनेश लाड यांचा मोलाचा वाटा आहे. रोहितच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेची ट्रॉफी उंचावली. आता रोहितने वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप आणि वनडे वर्ल्डकप जिंकावी, यासाठी दिनेश लाड यांनी पंढरपूरला जाऊन विठ्ठलाला साकडे घातले आहे.

काय म्हणाले दिनेश लाड?

दिनेश लाड यांनी साम टीव्हीशी बोलताना म्हटले की, 'रोहितने १३० कोटी जनतेला आनंद साजरा करण्याची संधी दिली आहे. तो याच शाळेत शिकला. सुरुवातीला त्याने गोलंदाजीचे धडे घेतले. त्यानंतर तो फलंदाज झाला. याच शाळेतून तो पुढे गेला. या शाळेतील मुलं जे जल्लोष करत आहेत. ते पाहून खूप आनंद झाला.' रोहित शर्मा ज्या शाळेत शिकला त्या शाळेत एका महिलेकडून एक कार सजवून आणण्यात आली ज्यावर भारतीय संघाचे सर्व खेळाडू विश्वचषक घेताना दाखवण्यात आले हीच कार रोहित शर्माच्या शाळेत आणण्यात आली यावेळी विद्यार्थ्यांकडून रोहित शर्माच्या नावाचा जयजयकार करण्यात आला.

भारतीय संघाला गेल्या ११ वर्षात आयसीसीची एकही ट्रॉफी जिंकता आली नव्हती. २०१३ मध्ये भारतीय संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. त्यानंतर भारतीय संघाने अनेकदा सेमिफायनल आणि फायनलमध्ये प्रवेश केला. मात्र आयसीसीची ट्रॉफी जिंकता आली नव्हती.

मात्र रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने आयसीसी टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला आणि दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या ट्रॉफीवर नाव कोरलं. या विजयानंतर भारतीय संघाचं मायदेशात जल्लोषात स्वागत करण्यात आलं. यासह मुंबईत विजयी रॅलीदेखील काढण्यात आली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Anant Chaturdashi 2025 live updates : लाडक्या बाप्पाला निरोप देताना लहान मुलांना अश्रू अनावर

Sahara India Scam : सहारा इंडियाच्या विरोधात ईडीची मोठी कारवाई; सुब्रतो रॉय यांच्या पत्नी, मुलांच्या अडचणीत वाढ

Zakir Khan: 'प्रकरण हाताबाहेर जाण्यापूर्वी...' झाकीर खानने केली मोठी घोषणा, स्टेज शोमधून घेणार ब्रेक

नाशिकमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीत शिवतांडव नृत्य ठरले विशेष आकर्षण|VIDEO

IPS अंजना कृष्णा प्रकरणात मिटकरींचा यू-टर्न; आधी चौकशीची मागणी,आता दिलगिरी

SCROLL FOR NEXT