Rohit Sharma Statement: 'जरा डोकं चालवा ना..', इंजमाम उल हकच्या आरोपांवर रोहित शर्माचं जोरदार प्रत्युत्तर,म्हणाला...
rohit sharma twitter
क्रीडा | T20 WC

Rohit Sharma Statement: 'जरा डोकं चालवा ना..', इंजमाम उल हकच्या आरोपांवर रोहित शर्माचं जोरदार प्रत्युत्तर,म्हणाला...

Ankush Dhavre

भारतीय संघ आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये भारत आणि इंग्लंड हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना गयानामध्ये होणार आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळणाऱ्या भारतीय संघाने आतापर्यंत या स्पर्धेतील एकही सामना गमावलेला नाही. तर इंग्लंडचा संघही तुफान फॉर्ममध्ये आहे. दरम्यान या सामन्यापूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेत रोहित शर्माने पाकिस्तानचा माजी कर्णधार इंजमाम उल हकने केलेल्या आरोपावर जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.

काय म्हणाला रोहित शर्मा?

रोहित शर्माला या पत्रकार परिषदेत, इंजमाम उल हकने केलेल्या बॉल टेम्परिंगच्या आरोपावर प्रश्न विचारण्यात आला. त्यावेळी रोहित शर्मा म्हणाला की,' मी यावर काय उत्तर देऊ? तुम्ही जर इथे दिवसा सामने खेळत असाल, तर खेळपट्टी कोरडी झालेली असते. त्यामुळे चेंडू रिव्हर्स स्विंग होतो. केवळ आमच्याच संघातील गोलंदाजांना नव्हे, तर सर्व संघातील गोलंदाजांना रिव्हर्स स्विंग मिळत आहे. कधी कधी डोक्याने विचार करणं गरजेचं असतं. आधी हे पाहा की, आम्ही कुठे खेळतोय. आम्ही इंग्लंड किंवा वेस्टइंडिजमध्ये खेळत नाहीये.

इंजमाम उल हकने केले होते आरोप

भारतीय संघातील गोलंदाज अर्शदीप सिंगने या स्पर्धेत दमदार कामगिरी केली आहे. त्याने सुरुवातीच्या षटकांमध्ये आणि शेवटच्या षटकांमध्येही शानदार गोलंदाजी करत संघाला विकेट्स काढून दिल्या आहेत. दरम्यान ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात अर्शदीप सिंग १५ वे षटक टाकण्यासाठी गोलंदाजीला आला होता. त्यावेळी अर्शदीप सिंगचा चेंडू रिव्हर्स स्विंग होताना दिसून आला होता. अर्शदीपची गोलंदाजी पाहून इंजमाम उल हकने वादग्रस्त प्रतिक्रिया दिली होती. या सामन्यात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियावर २४ धावांनी विजय मिळवला होता.

भारतीय संघाचा सेमिफायनलमध्ये प्रवेश

भारत आणि इंग्लंडमध्ये आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील सेमिफायनलचा सामना होणार आहे. हा सामना २७ जून रोजी गयानामध्ये रंगणार आहे. या सामन्यात भारतीय संघाकडे २०२२ मध्ये झालेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील पराभवाचा बदला घेण्याची संधी असणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

VIDEO: Team INDIA चे वानखेडेवर आगमन होण्याआधीच चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती

Team India Victory Celebration: बीसीसीआयकडून नरेंद्र मोदींना 'नमो 1' चॅम्पियन जर्सी गिफ्ट! पाहा PHOTO

Bride Tips: नवरी होण्याआधी मुलीने स्वत:मध्ये करा 'हे' 5 बदल

Team India's Victory Parade Live: वानखेडे स्टेडियमवर चेंगराचेंगरी?

Anant- Radhika Wedding : अंबानी-मर्चंट लग्न, भारताच्या लग्न उद्योगासाठी एक मोठा बदल

SCROLL FOR NEXT