Rohit Sharma Record: हिटमॅनने रचला इतिहास! या बाबतीत विराट अन् बाबरला मागे सोडत बनला नंबर 1

IND vs AUS, Rohit Sharma Record News In Marathi: भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने टी-२० क्रिकेटमध्ये मोठा कारनामा केला आहे.
Rohit Sharma Record: हिटमॅनने रचला इतिहास! या बाबतीत विराट अन् बाबरला मागे सोडत बनला नंबर 1
rohit sharmatwitter

भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या सामन्यात ९२ धावांची शानदार खेळी केली. या खेळीसह त्याने अनेक मोठ मोठे रेकॉर्ड्स मोडून काढले आहेत.रोहितने टी-२० आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याच्या बाबतीत बाबर आझम विराट कोहलीला मागे सोडलं आहे. प्रथम फलंदाजी करताना रोहितने मिचेल स्टार्कची चांगलीच धुलाई केली. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २० षटक अखेर २०५ धावांचा डोंगर उभारला.

सर्वाधिक धावा करणारा फलंदाज

रोहित शर्माच्या नावे टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याची नोंद झाली आहे. त्याने आतापर्यंत ३२.०३ च्या सरासरीने आणि १४०.७५ च्या स्ट्राईक रेटने ४१६५ धावा केल्या आहेत. टी-२० क्रिकेटमध्ये रोहितची बॅट चांगलीच तळपते. आतापर्यंत त्याने ५ शतकं आणि ३१ अर्धशतकं झळकावली आहेत.

Rohit Sharma Record: हिटमॅनने रचला इतिहास! या बाबतीत विराट अन् बाबरला मागे सोडत बनला नंबर 1
IND vs AUS, Turning Point: इथेच सामना फिरला! वाचा टीम इंडियाच्या शानदार विजयाचे 3 टर्निंग पॉईंट

हे आहेत टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज

रोहित शर्मा- ४१६५ धावा

बाबर आझम - ४१४५ धावा

विराट कोहली - ४१०३ धावा

पॉल स्टर्लिंग - ३६०१ धावा

मार्टिन गप्टील- ३५३१ धावा

Rohit Sharma Record: हिटमॅनने रचला इतिहास! या बाबतीत विराट अन् बाबरला मागे सोडत बनला नंबर 1
IND vs AUS,Highlights: पराभवाचा बदला घेतला! ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत टीम इंडियाची सेमिफायनलमध्ये धडक

भारतीय संघाचा शानदार विजय

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारतीय संघाने प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाकडून कर्णधार रोहित शर्माने सर्वाधिक ९२ धावांची खेळी केली. तर सूर्यकुमार यादवने ३१ धावांचं योगदान दिलं. या खेळीच्या बळावर भारतीय संघाने २०५ धावा केल्या.

ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी २०६ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाकडून ट्रेविस हेडने सर्वाधिक ७६ धावांची खेळी केली. त्याने ऑस्ट्रेलियाला जिंकवण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. मात्र यावेळी तो ऑस्ट्रेलियाला विजय मिळवून देऊ शकलेला नाही. या धावांचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाला ७ गडी बाद १८१ धावा करता आल्या. हा सामना २४ धावांनी जिंकत भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com