Rohit Sharma Statement: ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर रोहितने एकाच शब्दात दिलं उत्तर, म्हणाला..

India vs Australia, Rohit Sharma Statement in Marathi: भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये रोमांचक सामना पार पडला. हा सामना जिंकून भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे.
Rohit Sharma Statement: ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर रोहितने एकाच शब्दात दिलं उत्तर, म्हणाला ..
rohit sharmatwitter

आयसीसी टी -२० वर्ल्डकप २०२४ स्पर्धेतील ५१ व्या सामन्यात भारत आणि ऑस्ट्रेलिया हे दोन्ही संघ आमनेसामने आले होते. या सामन्यात ऑस्ट्रेलियाला धूळ चारत भारतीय संघाने स्पर्धेतील सेमिफायनलमध्ये एन्ट्री केली आहे. हा दोन्ही संघांसाठी सुपर ८ फेरीतील शेवटचा सामना होता. दरम्यान या विजयानंतर रोहित शर्माचा आनंद अनावर झाल्याचे पाहायला मिळले आहे. दरम्यान अर्धशतकी खेळीच्या बळावर त्याने सामनावीर पुरस्कारही पटकावला आहे.

सामन्यानंतर बोलताना रोहित म्हणाला की, ' समाधान.. विरोधी संघ किती घातक आहे हे आम्हाला माहीत होतं. मात्र एक संघ म्हणून आम्ही दमदार कामगिरी केली. आम्ही त्याच गोष्टी केल्या ज्या आम्हाला करण्याची गरज होती. यामुळे संघ म्हणून आमचा आत्मविश्वास वाढला. २०० धावा आव्हानात्मक होत्या. मात्र सामना जेव्हा या मैदानावर असतो त्यावेळी हवा महत्वाची भूमिका बजावते. मात्र मला वाटतं की, आम्हाला परिस्थितीची जाण होती आणि आम्ही त्याच अनुषंगाने प्रयत्नही केले. आम्हाला योग्यवेळी विकेट घ्यायची होती.'

Rohit Sharma Statement: ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर रोहितने एकाच शब्दात दिलं उत्तर, म्हणाला ..
IND vs AUS, Turning Point: इथेच सामना फिरला! वाचा टीम इंडियाच्या शानदार विजयाचे 3 टर्निंग पॉईंट

तसेच कुलदीप यादवबद्दल बोलताना तो म्हणाला की, ' तो काय करू शकतो हे आम्हाला चांगलच माहीत आहे. मात्र आम्हाला त्याचा वापर तेव्हाच करायचा आहे जेव्हा त्याची गरज असेल. न्यूयॉर्कची खेळपट्टी ही वेगवान गोलंदाजांसाठी फायदेशीर होती. त्यामुळे त्याला संघात घेता आलं नाही. मात्र आम्हाला माहीत होतं की, त्याची भूमिका अत्यंत महत्वाची आहे.'

Rohit Sharma Statement: ऑस्ट्रेलियाला लोळवल्यानंतर रोहितने एकाच शब्दात दिलं उत्तर, म्हणाला ..
IND vs AUS,Highlights: पराभवाचा बदला घेतला! ऑस्ट्रेलियाचा अहंकार मोडत टीम इंडियाची सेमिफायनलमध्ये धडक

भारतीय संघाने सेमिफायनलमध्ये प्रवेश केला आहे. याबाबत बोलताना तो म्हणाला की, ' आम्ही काहीच वेगळं करणार नाही. आम्हाला माहितेय कोणाला काय करायचं आहे. आम्ही विरोधी संघाचा फार विचार करत नाही. हा एक अटीतटीचा सामना असेल. एक संघ म्हणून आमच्यासाठी हे वेगळं नसेल.' भारतीय संघाचा सेमिफायनलचा सामना इंग्लंडविरुद्ध होणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com