rohit sharma  saam tv
Sports

Rohit Sharma Profile: कसा घडला भारताचा 'हिटमॅन' रोहित शर्मा? वाचा संपूर्ण प्रवास

Rohit Sharma Player Profile: रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली खेळताना भारतीय संघाने दुसऱ्यांदा टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली.

Ankush Dhavre

रोहित शर्मा हे नाव कुठलाच क्रिकेटप्रेमी विसरु शकणार नाही. जे कर्णधार म्हणून विराट कोहलीलानाही जमलं ते रोहित शर्माने करुन दाखवलं आहे. गेल्या ११ वर्षांपासून भारतीय संघ आयसीसी ट्रॉफीची आतुरतेने वाट पाहत होता. भारतीय संघ सेमिफायनल आणि फायनलमध्ये जात होता. मात्र फायनलमध्ये या संघाला विजय मिळवता येत नव्हता. अखेर भारतीय संघाने २०२४ च्या टी-२० वर्ल्डकप फायनलमध्ये दक्षिण आफ्रिकेला नमवलं आणि दुसऱ्यांदा आयसीसी टी-२० वर्ल्डकपची ट्रॉफी उंचावली. दरम्यान वर्ल्डकप विजेता कर्णधार रोहित शर्माचा क्रिकेटचा प्रवास कसा सुरु झाला? जाणून घ्या.

रोहित शर्माचा जन्म विदर्भातील नागपूर येथे ३० एप्रिल १९८७ रोजी झाला. रोहितची आई पौर्णिमा शर्मा ह्या विशाखापट्टणमच्या आहेत. त्यामुळे रोहित तेलुगु चांगल्याप्रकारे बोलू शकतो. रोहितचे वडील गुरुनाथ शर्मा हे एका ट्रांसपोर्ट कंपनीत गोदामात गार्ड म्हणून काम करायचे. घरची परिस्थिती अतिशय हलाकीची होती. त्यात वडीलांची नोकरी गेल्यामुळे परिस्थिती आणखीच बिकट झाली. रोहितच्या शिक्षणासाठी वडिलांनी त्याला बोरीवलीला आपल्या काकाकडे पाठवले. तिथे तो आजोबा आणि काकाकडे राहू लागला. काकांनी रोहितला शाळेत प्रवेश करुन दिला. रोहितला लहानपणापासूनच क्रिकेटची खूप आवड होती. रोहित मित्रांसोबत गल्ली क्रिकेट खेळायचा आणि शेजाऱ्यांच्या खिडकीचे काच फोडायचा. एकदा तर काच फोडल्यामुळे शेजाऱ्यांनी त्याची तक्रार पोलीस स्थानकात केली होती.

क्रिकेटची सुरुवात कशी झाली?

रोहितला क्रिकेट कॅम्प जॉइन करायचा होता, पण पैसे नव्हते. काकांचं उत्पन्न कमी होतं तरीही त्यांनी १९९९ मध्ये रोहितला एका प्रायवेट कॅम्पमध्ये घालून रोहितच्या क्रिकेटर बनण्याच्या स्वप्नाला सुरूवात करून दिली. त्यावेळी रोहितचे कोच दिनेश लाड होते. त्यांनी रोहितला त्याची शाळा बदलून स्वामी विवेकानंद इंटरनॅशनल स्कूलला प्रवेश घेण्यास सांगितले, कारण लाड तिथे कार्यरत होते. यामुळे रोहितला क्रिकेट खेळण्यासाठी जास्त सुविधा उपलब्ध झाल्या.

रोहितला क्रिकेटमुळे अभ्यासत लक्ष देता आले नाही. विद्यालयात रोहितची एक ऑफ स्पिनर म्हणून टीम मध्ये निवड झाली. प्रशिक्षक दिनेश लाड यांनी रोहितला सांगितले की तुझ्यात फलंदाजीची क्षमता आहे. तू फलंदाजीवर लक्ष केंद्रित कर पण त्यावेळी रोहितला आठव्या क्रमांकावर फलंदाजी मिळत होती. त्याला पहिल्यांदाच सलामीला जाण्याची संधी मिळाली आणि पहिल्याच सामन्यात त्याने शानदार कामगिरी केली.

क्रिकेट करिअर :

रोहितने आपल्या आंतरराष्ट्रीय करिअरची सुरुवात २००७ साली केली. आयर्लंडविरुद्ध एकदिवसीय पदार्पण केले तेव्हा रोहित सहाव्या क्रमांकावर फलंदाजी करायचा. पाकिस्तानविरुद्ध पहिलं एकदिवसीय अर्धशतक झळकावून त्याने एकदिवसीय क्रिकेटमध्ये आपली छाप सोडली. २००७ च्या टी-२० विश्वचषक स्पर्धेत रोहितने दक्षिण आफ्रिकेविरूद्ध अर्धशतक ठोकत आपल्या तडाखेबंद खेळीचा नमुना सादर केला.

ऑस्ट्रेलियामध्ये काॅमनवेल्थ बॅंक सिरीजच्या फायनलमध्ये त्याने ६६ धावांची खेळी करुन भारताला विजय मिळवून दिला. त्यानंतर रोहितच्या क्रिकेट करिअरमध्ये अनेक चढ-उतार आले.२००८- १०मध्ये रोहितला आयपीएलच्या डेक्कन चार्जर्स संघात स्थान मिळाले. पण खरी ओळख त्याला मुंबई इंडियन्स संघाने दिली. रोहितला २०१३ साली मुंबई इंडियन्स संघाचे नेतृत्व मिळालं आणि रोहितने मुंबई संघाला ५ आयपीएल ट्रॉफी आणि एक चॅम्पियन्स लिग टी२० ट्रॉफी मिळवून दिली. रोहितची आक्रमक फलंदाजी पाहता रोहितला २०१३ मध्ये झालेल्या चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत सलामीला फलंदाजी करण्यासाठी पाठवण्यात आले. इथून रोहितच्या क्रिकेट करिअरला नवीन वळण मिळाले. आज रोहित शर्मा भारताचा सर्वोत्कृष्ट सलामीवीर आहे. सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार म्हणून नाव गाजवतोय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Monsoon Update : मुंबई, ठाण्यात जोरदार पाऊस बरसणार ; जाणून घ्या सविस्तर

GK: दोन राष्ट्रपती असलेला एकमेव देश कोणता? ९९% लोकांना माहित नसेल

Ladki Bahin Yojana: २७ हजार लाडक्या बहिणींचे ₹१५०० कायमचे बंद, लाडकीचा अर्ज का केला बाद?

Nilesh Sable : बॉलिवूड कलाकार अन् मराठी भाषा, CHYD बाबत निलेश साबळे स्पष्ट म्हणाला...

Mumbai: घरातले साखरझोपेत, वाहतूक पोलिसानं टोकाचं पाऊल उचललं; गळफास घेत आयुष्य संपवलं

SCROLL FOR NEXT