सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली नगरपंचायतीसाठी ठाकरेसेना आणि शिंदेसेना एकत्र येणार असल्याची चर्चा रंगली... त्यासाठी दोन्ही पक्षांच्या कार्यकर्त्यांमध्ये बैठकाही झाल्या...मात्र आता याचं बैठकांनंतर नारायण राणेंनी ठाकरेंसोबत शिंदेसेनेने युती केल्यास दोन जिल्ह्यात त्यांच्याशी संबंध तोडू अशा थेट इशारा दिलाय.तर दुसरीकडे भाजपसोबत युतीचा हात कायम आहे.मात्र युती न झाल्यास चारही नगरपालिकांमध्ये स्वबळावर लढू असा इशारा उदय सामंतांनी दिलाय....
कणकवलीतलं राजकारण नेहमीच राणे विरुद्ध इतर पक्ष असं राहिलयं... अशातच नारायण राणेंनी संबंध तोडण्याचा इशारा दिल्यानं महायुतीतला तणाव आणखीनच वाढलाय... मात्र याचं तणावात राणे बंधूंही एकमेंकासमोर उभे ठाकलेत...दोन्ही राणे बंधूंनी जिल्हा परिषदेत आमचाच अध्यक्ष होणार असल्याचं विधान केलयं... त्यामुळे राणे बंधूंमधलं हे शीतयुद्ध थांबवण्यासाठी नारायण राणेंनाच हस्तक्षेप करावा लागला....
सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या राजकारणात राणे पिता-पुत्रांचं नेहमीचं वर्चस्व राहिलयं... मात्र नितेश राणे भाजपात आणि निलेश राणे शिंदेसेनेत असल्यानं पक्षश्रेष्ठीच्या आदेशाचं पालन करून पक्षाच्या सत्तेसाठी कार्यरत राहण्याशिवाय त्यांना गंत्यतर नाही... अशातच ठाकरेसेना आणि शिंदेसेना एकत्र येण्याच्या चर्चेनं महायुतीतील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आलाय... आता स्थानिक राजकारणासाठी सिंधुदुर्गात महायुती नेमका कोणता फॉम्युला वापरते... राणेंना शह देण्यासाठी शिंदेसेना विरोधकांशी हातमिळवणी करणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे....
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.