Rohit Sharma Turns 36 Twitter @CricCrazyJohns
Sports

Rohit Sharma Records: दुहेरी शतकांच्या बादशाहाने विश्वचषकात रचलाय इतिहास! हे आहेत 'हिटमॅन'चे खास रेकॉर्ड

Rohit Sharma Turns 36 : जागतिक क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर असे अनेक मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत, जे तोडणे आता अशक्य आहे.

Chandrakant Jagtap

Rohit Sharma Birthday Special: टीम इंडियाचा कर्णधार आणि स्टार फलंदाज रोहित शर्मा त्याच्या स्फोटक फलंदाजीच्या शैलीसाठी जगभरात प्रसिद्ध आहे. आज 'हिटमॅन' रोहित शर्मा ३६ वा वाढदिवस साजरा (Rohit Sharma Birthday Celebration) करत आहे. जागतिक क्रिकेटमध्ये रोहित शर्माच्या नावावर असे अनेक मोठे विक्रम नोंदवले गेले आहेत, जे तोडणे आता अशक्य आहे. त्यांच्या ३६ व्या वाढदिवसानिमित्त जाणून घेऊया त्यांच्याशी संबंधित काही खास रेकॉर्ड.

एकदिवसीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक द्विशतक

एकदिवसीय क्रिकेटमध्ये तीन द्विशतके झळकावणारा रोहित शर्मा हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे. रोहित व्यतिरिक्त संपूर्ण जगात एकूण ११ खेळाडूंनी द्विशतक झळकावले आहे. परंतु रोहितच्या बरोबरीने दोनपेक्षा जास्त वेळा हा पराक्रम कोणीही केलेला नाही.

सर्वाधिक ट्रॉफी आयपीएल जिंकणारा कर्णधार

इंडियन प्रीमियर लीगमध्ये मुंबई इंडियन्सचा कर्णधार असताना रोहित शर्माने पाच ५ वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावले आहे. या लीगमधील इतर कोणत्याही कर्णधाराला अशी कामगिरी करता आलेली नाही.

एका डावात बाउंड्री मारून सर्वाधिक धावा

रोहित शर्माने एकदिवसीय क्रिकेटच्या एका डावात केवळ बाउंड्रीच्या साह्याने १८६ धावा करण्याचा पराक्रम केला आहे. रोहितने १०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या २६४ धावांच्या खेळीत केवळ बांउंड्री मारून १८६ धावा केल्या होत्या. यात ३३ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश होता.

एका वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज

रोहित शर्माने एका वर्षात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम आपल्या नावावर केला आहे. रोहितने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका वर्षात एकूण ७८ षटकार मारले आहेत. अशी कामगिरी करणारा रोहित जगातील एकमेव फलंदाज आहे.

टी-२० मध्ये सर्वाधिक शतके

भारताचा स्टार फलंदाज रोहित शर्मा हा जागतिक क्रिकेटमधील एकमेव असा खेळाडू आहे ज्याच्या नावावर टी-२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सर्वाधिक शतकांचा विक्रम आहे. टीम इंडियाकडून खेळताना रोहित शर्माने एकूण ४ शतके झळकावली आहेत. (Latest Sports News)

विश्वचषक २०१९ मध्ये रोहितने रचला इतिहास

आयसीसी विश्वचषक २०१९ मध्ये रोहित शर्मा जोरदार फॉर्ममध्ये होता. या विश्वचषकात त्याने इतिहास रचला. रोहितने एकाच विश्वचषकात ५ शतके झळकावून विश्वविक्रम केला होता. एकाच विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकण्याचा हा विक्रम आहे. त्याने विश्वचषकात सर्वाधिक शतके ठोकून सचिन तेंडुलकरच्या विक्रमाची बरोबरी केली. रोहितचे हे विश्वचषक स्पर्धेतील सहावे शतक होते. (Latest Marathi News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Politics: ठाकरे बंधू एकत्र येताच नितेश राणेंचा टोला, नवरा कोण आणि नवरी कोण?|VIDEO

Maharashtra Live News Update: शक्तीपीठ महामार्गामुळे राधानगरी ,करवीर आणि पन्हाळा तालुक्यातील गावांना बसणार फटका

Hair Care Tips: झोपताना केस बांधावे की मोकळे ठेवावे, काय फायदेशीर?

Sweet Corn Dosa Recipe : पावसाळ्यात संध्याकाळचा नाश्ता होईल खास, १० मिनिटांत बनवा चटपटीत 'स्वीट कॉर्न डोसा'

Accident: भीषण अपघात! अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या बसचा ब्रेक फेल, ४ वाहनांना धडक; ३६ प्रवासी गंभीर जखमी

SCROLL FOR NEXT