Rohit Sharma Birthday: धोनीनं ओपनर नावाचं इंजिन लावलं अन् हिटमॅन एक्सप्रेस सुसाट पळाली

Rohit Sharma Birthday Special: २०१३ मध्ये जर ती घटना घडली नसती जर टीम इंडियाला 'हिटमॅन' कधीच मिळाला नसता
Rohit sharma birthday
Rohit sharma birthday saam tv
Published On

Happy Birthday Rohit Sharma: एखाद्या क्रिकेटपटूला संघात आपलं स्थान निर्माण करण्यात आणि ते टिकवून ठेवण्यात वर्षे निघून जातात. मात्र कारकीर्द संपणार हे दिसत असताना नव्याने कारकीर्द सुरू करणं, हे देखील एक टॅलेंट आहे. असं टॅलेंट काही मोजक्याच खेळाडूंमध्ये असतं. नशिबाने भारतीय संघाचा कर्णधार देखील याच टॅलेंटेड खेळाडूंपैकी एक आहे.

हिटमॅन म्हणून प्रसिध्द असलेल्या रोहित शर्माची कारकीर्द देखील जवळजवळ संपुष्टात आली होती. मात्र धोनीच्या एका निर्णयाने त्याची कारकीर्द नव्याने सुरू झाली.

आज भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपला ३६ वा वाढदिवस साजरा करतोय. या खास दिवशी जाणून घ्या, कशी झाली त्याच्या नव्या कारकिर्दीची नवी सुरुवात. (Rohit Sharma Birhtday)

Rohit sharma birthday
Rohit Sharma IPL 2023: रोहित शर्मा IPL 2023 मधून माघार घेणार?, माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

२००७ मध्ये केले पदार्पण..

रोहित शर्मा हा भारतीय संघातील अनुभवी खेळाडूंपैकी एक आहे. जेव्हा विराट अंडर -१९ वर्ल्ड कपही खेळला नव्हता तेव्हा त्याने भारतीय संघासाठी पदार्पण केलं होतं. मात्र विराट मागून येऊन पुढे निघाला आणि रोहित तिथेच राहिला. रोहितने २००७ मध्ये भारतीय संघासाठी पदार्पण केलं होते.

भारतीय संघाला २००७ टी-२० वर्ल्ड कप जिंकवून देण्यात रोहितने मोलाची भूमिका बजावली होती. मात्र ज्यावेळी कारकिर्दीत वेगाने पुढे जायची वेळ आली त्याचवेळी हिटमॅनने गियर कमी केला आणि हळू गतीने पुढे जायला सुरुवात केली. फलंदाजीत फ्लॉप, सामना जिंकवून देण्यात अपयशी, याच कारणांमुळे त्याला २०११ च्या वर्ल्ड कप संघात स्थान मिळालं नव्हतं.

हिटमॅन एक्स्प्रेस रुळावरून उतरणार, इतक्यात एमएस धोनीने त्याला ओपनिंग नावाचं इंजिन लावलं. हे इंजिन लावताच हिटमॅन एक्सप्रेस सुसाट पळाली. पुढे जाऊन रोहितने अनेक विक्रम मोठ मोठे विक्रमही मोडून काढले. (Latest sports updates)

Rohit sharma birthday
Rohit Sharma: रोहित शर्मा कुठंय? सूर्यकुमार यादव नाणेफेकीला का आला? समोर आलं मोठं कारण

धोनीने दिली संधी..

मधल्या फळीत रोहित शर्मा पूर्णपणे फ्लॉप ठरत होता. त्याला संघाबाहेर करण्याची मागणी जोर धरत होती. २०१३ मध्ये इंग्लंड संघाविरुद्ध वनडे मालिका सुरू झाली. या मालिकेतील पहिल्या ३ सामन्यांमध्ये त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. मधल्या फळीत फलंदाजीला येणाऱ्या रोहितला चौथ्या सामन्यात सलामीला जाण्याची संधी मिळाली. त्याने या संधीचं सोनं केलं. संघातील इतर फलंदाज जेव्हा फ्लॉप ठरले. त्याच डावात रोहितने ८२ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. इथूनच सुरू झालं हिटमॅनच्या कारकिर्दीतील सुवर्णकाळ.

मुख्य बाब म्हणजे या सामन्यात गौतम गंभीर, युवराज सिंग आणि विराट कोहली सारखे दिग्गज खेळाडू स्वस्तात माघारी परतले होते. अशा परिस्थितीत रोहितने भारतीय संघाचा डाव सावरला होता. त्याने सुरेश रैनासोबत मिळून ६८ धावांची भागीदारी केली होती.

Rohit sharma birthday
Rohit Sharma Video Call: 'फॅमिली मॅन' हिट मॅन! सामना जिंकताच पत्नी रितिकाला केला Video कॉल, हटके स्टाईलमध्ये केला विजयाचा जल्लोष

झळकावली ३ दुहेरी शतके...

रोहित शर्मा हा जगातील एकमेव क्रिकेटपटू आहे ज्याने वनडे क्रिकेटमध्ये ३ वेळेस दुहेरी शतक झळकावले आहे. तसेच त्याच्या वनडे कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने २४३ वनडे सामन्यांमध्ये ४८.६४ च्या सरासरीने ९८२५ धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याने ३० शतके तर ४८ अर्धशतके झळकावली आहेत. यादरम्यान २६४ धावा ही त्याची सर्वोत्तम खेळी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com