Rohit Sharma IPL 2023: रोहित शर्मा IPL 2023 मधून माघार घेणार?, माजी खेळाडूने दिला मोलाचा सल्ला

Rohit Sharma 'needs a little bit of a break' from the IPL: आयपीएल सुरू असताना भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला एक मोलाचा सल्ला दिला आहे.
Rohit Sharma IPL 2023
Rohit Sharma IPL 2023Saam TV

Cricketer Rohit Sharma: इंडियन प्रीमिअर लीग अर्थात आयपीएलचा १६ व्या हंगामात सध्या जोमात सुरू आहे. आतापर्यंत हंगामातील निम्मे सामने संपले आहेत. यंदाच्या हंगामात क्रिडाप्रेमींना डेथ ओव्हरचा थरार अनुभवायला मिळतोय. कारण, हंगामातील सर्वच सामने शेवटच्या षटकापर्यंत जात आहेत. मंगळवारी आयपीएलमध्ये गुजरात टायटन्स आणि मुंबई इंडियन्समध्ये रंगदार सामना झाला.  (Latest sports updates)

Rohit Sharma IPL 2023
WTC Final: टीम इंडियाचा विजय पक्काच समजा! WTC फायनलसाठी BCCI ने खतरनाक खेळाडूला दिला अचानक प्रवेश

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात (IPL 2023) हार्दिक पांड्याच्या गुजरात टायटन्सने रोहित शर्माच्या मुंबई इंडियन्सचा तब्बल ५४ धावांनी पराभव केला. मुंबईचा हा सलग दुसरा पराभव असून यंदाच्या हंगामातील चौथा पराभव आहे.

दरम्यान, आयपीएल सुरू असताना भारतीय संघाचे माजी दिग्गज खेळाडू सुनील गावस्कर यांनी मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला (Rohit Sharma) एक मोलाचा सल्ला दिला आहे. रोहित शर्माने आयपीएलमधून तातडीने माघार घ्यावी, असं सुनील गावस्कर यांनी म्हटलं आहे.

Rohit Sharma IPL 2023
RCB VS KKR Match Prediction: चिन्नास्वामीच्या मैदानावर RCB घेणार का पराभवाचा बदला? पाहा मॅच प्रेडिक्शन आणि प्लेइंग 11

आगामी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यासाठी हिटमॅन तंदुरूस्त असणे गरजेचे असून त्याने आता विश्रांती घ्यायला हवी, असे गावस्करांचे म्हणणे आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना ७ ते ११ जून या दरम्यान, लंडनमधील ओव्हल मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय संघाने सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली असून यावेळी त्यांचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलिया संघासोबत होणार आहे.

WTC फायनल सामन्यासाठी भारतीय संघ

रोहित शर्मा (कर्णधार), शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, अजिंक्य रहाणे, के.एल. राहुल, के.एस. भरत (यष्टीरक्षक), रवींद्र जडेजा, रविचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, शार्दुल ठाकूर, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, उमेश यादव, जयदेव उनाडकट.

Edited by - Satish Daud

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com