Rishabh Pant Ind Vs Eng x
Sports

Rishabh Pant : दोन डावात दोन शतकं ठोकणाऱ्या रिषभ पंतला आयसीसीचा दणका

Ind Vs Eng 1st Test : भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्यामध्ये रिषभ पंतने शानदार कामगिरी केली. त्याने दोन डावात दोन शतके ठोकले. पण त्याच्यावर आयसीसीने मोठी कारवाई केली आहे.

Yash Shirke

Rishabh Pant ने भारत विरुद्ध इंग्लंड पहिल्या कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांमध्ये शतकीय कामगिरी केली आहे. एकाच कसोटी सामन्यामधील दोन्ही डावांमध्ये शतक ठोकणारा रिषभ पंत दुसरा विकेटकिपर बॅट्समॅन आहे. ही शानदार कामगिरी केल्यानंतरही पंतला आयसीसीने फटकारले आहे. रिषभ पंतवर कारवाई देखील करण्यात आली आहे.

आयसीसीने रिषभ पंतवर केलेल्या कारवाईबाबत माहिती दिली आहे. पंतने खेळाडू आणि सहाय्यक कर्मचाऱ्यांशी वाईट वागणूक करत आयसीसी आचारसंहितेच्या कलम २.८ चे उल्लंघन केले आहे. भारत विरुद्ध इंग्लंड सामन्यादरम्यान रिषभ पंतने अंपायर्सच्या निर्णयाशी असहमती दर्शवली होती, असे आयसीसीच्या निवेदनात म्हटले आहे.

https://www.icc-cricket.com/news/india-player-sanctioned-following-day-3-incident-in-leeds

पहिल्या डावामध्ये जेव्हा इंग्लंडचे बेन स्टोक्स आणि हॅरी ब्रूक हे खेळाडू फलंदाजी करत होते, त्यावेळेस रिषभ पंत चेंडू बदलण्यासाठी अंपायर्ससोबत उभा होता. अंपायर्सनी चेंडू तपासल्यानंतर तो बदलण्यास नकार दिला. अंपायर्सनी चेंडू पुन्हा एकदा तपासून बदलावा अशी पंतची इच्छा होती. पण अंपायर्सनी नकार दिल्याने त्याने चेंडू जमिनीवर जोरात फेकला. ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. याचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

ग्राउंड अंपायर्स ख्रिस गॅफनी, पॉल रीफेल; थर्ड अंपायर शराफुद्दौला इब्ने शाहिद आणि फोर्थ अंपायर माइक बर्न्स यांनी रिषभ पंतवर आरोप केले. पंतने गुन्हा स्वीकारल्यामुळे त्याच्यावर कोणतीही शिस्तभंगाची सुनावणी झाली नाही आणि प्रकरण थोडक्यात मिटले. मागील २४ महिन्यातला रिषभ पंतचा हा पहिलाच गुन्हा असल्याने त्याच्या शिस्तभंगाच्या रेकॉर्डमध्ये एक डिमेरिट पॉइंट जोडण्यात आला आहे. जर पंतने पुन्हा आचारसंहितेचे उल्लंघन केले, तर त्याच्यावर दंडात्मक कारवाई केली जाईल.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Ganapati Visarjan: पुण्यातील मानाचे गणपती विसर्जन मिरवणुकीचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या संपूर्ण मार्ग

Maharashtra Live News Update: गणपतीच्या दर्शनासाठी राज ठाकरे वर्षा बंगल्यावर, मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

Maharashtra Government : फडणवीस सरकारचा मास्टरस्ट्रोक; राज्यातील २ रेल्वे मार्गाला ग्नीन सिग्नल, वाचा सविस्तर

Maratha Reservation: मागणीची पूर्तता करणारा जीआर नाही; वकील असीम सरोदेंचं सखोल विश्लेषण|VIDEO

Panic Attack : पॅनिक अटॅक कसा ओळखावा आणि प्रथोमपचार काय करावे ?

SCROLL FOR NEXT