Ricky Ponting Video X
Sports

Ricky Ponting : पंजाब किंग्सच्या खेळाडूंमुळे रिकी पाँटिंगवर 'कचरा' गोळा करण्याची वेळ; Video Viral

Ricky Ponting Video : राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर पंजाब विरुद्ध हैदराबाद हा सामना सुरु आहे. या सामन्यादरम्यान पंजाब किंग्सचा प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंगचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

Yash Shirke

Ricky Ponting IPL 2025 : पंजाब किंग्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद हा सामना आज राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जात आहे. हा सामना खेळण्यासाठी पंजाबचा संघ हैदराबादला पोहोचला आहे. पंजाबचा प्रमुख प्रशिक्षक रिकी पाँटिंग देखील खेळाडूंसोबत आहे. सामन्यादरम्यान रिकी पाँटिंगच्या एका व्हिडीओची सोशल मीडियावर चर्चा पाहायला मिळत आहे.

व्हायरल व्हिडीओमध्ये रिकी पाँटिंग स्टेडियममधील कचरा उचलून एकत्र करत असल्याचे पाहायला मिळते. स्टेडियमच्या मैदानात, खुर्च्यांजवळ, डगआउटच्या आसपास झालेला कचरा रिकी पाँटिंग उचलून कचऱ्याच्या डब्यात टाकतो. पंजाब किंग्सच्या सोशल मीडिया अकाउंट्सवर रिकीचा हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ सराव सत्रादरम्यानचा आहे. सराव केल्यानंतर खेळाडू मैदानाच्या बाहेर पडले. पण रिकी पाँटिंग शेवटपर्यंत स्टेडियमवर थांबला. मैदानातील खाली झालेल्या प्लास्टिकच्या बाटल्या उचलतो. शहाळं, केळ्याच्या साली असा कचरा एकत्र करुन कचरापेटीमध्ये फेकून देत असल्याचे व्हिडीओमध्ये पाहायला मिळते. या कृतीमुळे रिकी पाँटिंगचे कौतुक होत आहे.

रिकी पाँटिंगच्या मार्गदर्शनामध्ये पंजाब किंग्सच्या संघाने आयपीएल २०२५ मध्ये चांगला खेळ केला आहे. पंजाबने आतापर्यंत चार सामने खेळले आहेत. यातील तीन सामन्यांमध्ये पंजाबच्या संघाने जिंकले आहेत. पॉईंट्स टेबलवर पंजाब किंग्सचा संघ वरच्या क्रमावर आहे. आज चौथ्या विजयासाठी पंजाबचा संघ हैदराबादच्या समोर लढत जिंकावी लागणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

8th Pay Commission: दुर्गापूजेपूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना बोनस मिळणार? मोठी मागणी समोर

5 Energy Booster Ladoo: ताकद आणि पोषणाचा खजिना! आरोग्यासाठी फायदेशीर ठरतील ‘हे’ ५ एनर्जी बुस्टर लाडू

Maharashtra News Live Update: देशातून फरार असलेला निलेश घायवळ खंडणी प्रकरणात निर्दोष मुक्त

Neeru Dhanda Asian Games 2026: नीरू ढांडाचा ट्रॅप शूटिंगमध्ये 'सुवर्ण'वेध, भारताला पाचवं गोल्ड मेडल

Maharashtra Drought: शेतकऱ्यांना दिलासा! दुष्काळात वगळलेल्या तालुक्यांचा यादीत समावेश, फडणवीस सरकारचा मोठा निर्णय

SCROLL FOR NEXT