
लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यामध्ये रिषभ पंत २१ धावांवर बाद झाला. विकेटकिपिंग करत असताना देखील पंतकडून अनेक चुका झाल्याचे पाहायला मिळाले. सामना सुरु असताना रिषभ पंतचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. या व्हिडीओमध्ये मिसफ्लिंड करताना दिसत आहे. विकेटकिंपिगमध्ये झालेल्या चुकांमुळे रिषभ पंतला ट्रोल केले जात आहे.
व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये रिषभ पंत गोलंदाजी करत असलेल्या दिग्वेश राठीला प्लान सांगत असल्याचे पाहायला मिळते. त्या वेळेस शेरफेन रुदरफोर्ड फलंदाजी करत होता. दरम्यान पंतच्या सूचनांनुसार राठीने बॉल फेकला. रुदरफोर्डला आउट करण्यासाठीचा रिषभ पंतने परफेक्ट प्लान केला. राठीच्या बॉलवर रुदरफोर्डने मोठा शॉट मारला.
रुदरफोर्डने मारलेल्या शॉटमुळे बॉल उंच उडाला. बॉल पकडण्यासाठी पंत पुढे धावला. कॅचसाठी कुणीही मध्ये येऊ नये असेही त्याने इतर खेळाडूंना सांगितले. त्याने हेल्मेट देखील काढले. पण रिषभ पंतच्या ग्लोजमधून बॉल निसटून खाली जमिनीवर गेला. स्वत: बनवलेला प्लानमध्ये रिषभ पंतची फसगत झाली. दरम्यान ही घटना कॅमेऱ्यामध्ये कैद झाली. सोपी वाटणारी कॅच सोडल्याने रिषभ पंतवर टीका झाली.
गुजरात टायटन्सची प्लेइंग ११ -
साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज
लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग ११ -
एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, रवी बिश्नोई
सकाळ+चे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.