Digvesh Rathi : झुकेगा नही साला... दिग्वेश राठीचे मैदानात पुन्हा सेलिब्रेशन, BCCI कडून कारवाई होणार?

Digvesh Rathi Celebration :लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स सामन्यामध्ये दिग्वेश राठीने बटलरचा बाद केले. बटलर कॅचआउट झाल्यानंतर राठीने सेलिब्रेशन केले. त्याच्या या सेलिब्रेशनची सोशल मीडियावर चर्चा होत आहे.
Digvesh Rathiं
Digvesh Rathix
Published On

IPL 2025 मध्ये लखनऊ सुपर जायंट्सच्या दिग्वेश राठीच्या नोटबुक सेलिब्रेशनची चर्चा पाहायला मिळत आहे. आजच्या लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स सामन्यातही दिग्वेश राठीने जोश बटलरची विकेट घेतल्यानंतर सेलिब्रेशन केले आहे. त्याने हाताच्या ऐवजी जमिनीवर लिहित सेलिब्रेशन केले आहे. केकेआरच्या सामन्यात त्याने केलेल्या सेलिब्रेशनची चर्चा झाली होती.

नोटबुक सेलिब्रेशन केल्याने दिग्वेश राठीवर बीसीसीआयने कारवाई केली होती. पंजाब आणि मुंबई विरुद्धच्या सामन्यात नोटबुक सेलिब्रेशन केल्याची त्याला दंड ठोठावण्यात आला होता. त्यानंतर राठीने वेगळ्या प्रकारचे सेलिब्रेशन करायला सुरुवात केली आहे. आता या सेलिब्रेशनमुळे दिग्वेश राठीवर बीसीसीआय कारवाई करणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान एकाना स्टेडियमवर दिग्वेश राठीचे पोस्टर पाहायला मिळाले. या पोस्टवर 'आमदनी अठ्ठनी खर्चा रुपया' असे लिहिलेले होते. सोशल मीडियावर या पोस्टरची चर्चा होत आहे.

Digvesh Rathiं
CSK मध्ये वादाची ठिणगी? धोनी कर्णधार होताच ऋतुराजचं मोठं पाऊल, सोशल मीडियावरील कृतीतून चित्रच समोर आलं

एकाना स्टेडियमवर लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध गुजरात टायटन्स हा सामना खेळला जात आहे. या सामन्यामध्ये लखनऊ सुपर जायंट्सचा कर्णधार रिषभ पंतने टॉस जिंकला आणि पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. गुजरात टायटन्सने २० ओव्हर्समध्ये एकूण १८० धावा केल्या. इनिंग्सच्या सुरुवातीला सामना गुजरातच्या हातात होता. पण दोन्ही सलामीवीर बाद झाल्यानंतर लखनऊने कमबॅक केले.

Digvesh Rathiं
IPL 2025 : 'हे माझं मैदान...'; केएल राहुलनंतर वरुण चक्रवर्तीचा व्हिडिओ व्हायरल, पाहा पोस्ट

गुजरात टायटन्सची प्लेइंग ११ -

साई सुदर्शन, शुभमन गिल (कर्णधार), जोस बटलर, वॉशिंग्टन सुंदर, शेरफेन रदरफोर्ड, शाहरुख खान, राहुल तेवतिया, अर्शद खान, रशीद खान, रविश्रीनिवासन साई किशोर, मोहम्मद सिराज

लखनऊ सुपर जायंट्सची प्लेइंग ११ -

एडन मार्कराम, निकोलस पूरन, रिषभ पंत (कर्णधार), हिम्मत सिंग, डेव्हिड मिलर, अब्दुल समद, शार्दुल ठाकूर, आकाश दीप, दिग्वेश सिंग राठी, आवेश खान, रवी बिश्नोई

Digvesh Rathiं
LSG VS GT : तूच रे... झहीर खानने सांगितलं सिक्रेट अन् रवी बिश्नोईने घेतली साई सुदर्शनची विकेट

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com