RCB Vs PBKS IPL 2025 Final  x
Sports

Ee Sala Cup Namde! विराटचं स्वप्न पूर्ण, १८ वर्षांनी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने जिंकली IPL ची ट्रॉफी

RCB Vs PBKS IPL 2025 Final : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या आयपीएल २०२५ च्या अंतिम सामन्यात बंगळुरूचा विजय झाला आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या संघाने आयपीएल २०२५ ची ट्रॉफी जिंकली आहे.

Yash Shirke

IPL 2025 चा अंतिम सामना जिंकत रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने आयपीएलच्या ट्रॉफीवर नाव कोरले आहे. १८ वर्षांनंतर आरसीबीने आयपीएलचे विजेतेपद मिळवले आहे. तर दुसऱ्या बाजूला पंजाब किंग्स या संघाचे ट्रॉफी जिंकण्याचे स्वप्न भंगले आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध पंजाब किंग्स या आयपीएल २०२५ च्या फायनल सामन्यामध्ये पंजाब किंग्सचा कर्णधार श्रेयस अय्यरने टॉस जिंकला आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचे शिलेदार फलंदाजीसाठी मैदानात उतरले. २० ओव्हर्समध्ये बंगळुरूने ९ विकेट्स गमावत १९० धावा केल्या.

सलामीसाठी आलेला फिल सॉल्ट १६ धावा केल्या. त्यानंतर आलेल्या मयंक अग्रवालने २४ धावा केल्या. २६ धावा करुन कॅप्टन रजत पाटीदार माघारी परतला. एका बाजूला विकेट पडत असताना विराट कोहली संयमी खेळ करताना दिसला. तो ४३ धावांवर बाद झाला. लियाम लिव्हिंगस्टोन २५ धावा आणि जितेश शर्मा २४ धावा करत मध्यल्या ओव्हर्समध्ये खेळ पुढे नेला. शेवटच्या ओव्हर्समध्ये रोमारियो शेफर्डने १७ धावा केल्या. शेवटच्या ओव्हरमध्ये सलग ३ विकेट्स पडल्या. दुसऱ्या बाजूला पंजाबकडून काईल जेमिसन आणि अर्शदीप सिंह यांनी प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. उरमजाई, वैशाख विजय कुमार आणि युजवेंद्र चहल यांनी प्रत्येकी १-१-१ अशा ३ विकेट्स घेतल्या.

१९१ धावांचे लक्ष्य गाठताना प्रभसिमरन सिंह आणि प्रियांश आर्य हे सलामीवीर मैदानात उतरले. फिल सॉल्टने दमदार कॅच पकडून प्रियांश आर्यला बाद केले. प्रियांशने २४ धावा केल्या. प्रभसिमरन सिंह २६ धावांवर बाद झाला. त्यानंतर कॅप्टन श्रेयस अय्यर मैदानात आला. फक्त १ धाव करुन अय्यर तंबूत परतला. त्यानंतर ३९ धावांवर जोस इंग्लीसची विकेट पडली. नेहाल वढेरा आणि शशांक सिंह यांनी खेळ सावरण्याचा प्रयत्न केला. पण तेवढ्यात वढेराची विकेट पडली. वढेराने १५ धावा केल्या. मार्कस स्टोइनिसने पहिल्या चेंडूवर षटकार मारला. लगेच दुसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. लगेच पुढच्या ओव्हरमध्ये अझमतुल्ला ओमरझाई कॅचआउट झाला. शेवटी शशांक सिंहने झुंज देण्याचा प्रयत्न केला पण तो अयशस्वी राहिला. शेवटी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने सामना जिंकला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office Scheme: पोस्ट ऑफिसची जबरदस्त योजना, सर्वाधिक व्याजाचा लाभ कुणाला मिळणार?

Relationship Tips : रिलेशनशिपमध्ये सतत भांडणं का होतात?

Maharashtra Politics: ठाकरे ब्रॅंड असता, तर बाळासाहेब असतानाच 288 आमदार आले असते - संजय गायकवाड|VIDEO

Lucky Zodiac Signs: 'या' 5 राशींना पावणार विठुराया; संकटं दूर होतील घरात येईल लक्ष्मी

Maharashtra Live News Update: CM देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत पंढरपुरात आरोग्यवारी सोहळा

SCROLL FOR NEXT