RCB vs DC IPL 2024 rishabh pant and umpire DRS controversy amd2000 twitter
Sports

LSG vs DC, IPL 2024: 'मी तर DRS घेतलाच नव्हता..' लाईव्ह सामन्यात रिषभ अन् अंपायरमध्ये वाद! नेमकं काय घडलं?

Rishabh Pant - Umpire DRS Controversy: आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. या सामन्यात रिषभ पंत आणि अंपायरमध्ये DRS वरुन वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

Ankush Dhavre

आयपीएल २०२४ स्पर्धेतील २६ वा सामना लखनऊ सुपर जायंट्स आणि दिल्ली कॅपिटल्स या दोन्ही संघांमध्ये सुरु आहे. हा सामना लखनऊच्या एकाना स्टेडियममध्ये सुरु आहे. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघाने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान या सामन्यात अंपायर आणि रिषभ पंत यांच्यात DRS वरुन वाद झाल्याचे पाहायला मिळाले आहे. नेमकं काय घडलं?जाणून घ्या.

या सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचा संघ प्रथम गोलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला आहे. दरम्यान डावातील चौथे षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा गोलंदाजीला आला होता. या षटकातील चौथा चेंडू इशांत शर्मा वाईड टाकला. जो लेग गार्डच्या अगदी जवळून गेला. त्यावेळी रिषभ पंतला वाटलं की, चेंडू लेग गार्डला स्पर्श झाला आहे. त्यामुळे DRS ची मागणी करण्याच्या विचारात होता. त्याने DRS साठी हात वर तर केला मात्र DRS ची मागणी केली नव्हती.

रिषभने DRS घेतोय असा इशारा करताच अंपायरने वाईड चेंडू चेक करण्यासाठी तिसऱ्या अंपायरकडे निर्णय पाठवला. DRS मध्ये हा चेंडु वाईड असल्यचं दिसून आलं. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला १ रिव्ह्यू गमवावा लागला.

तिसऱ्या अंपायरने आपला निर्णय ऐकवल्यानंतर रिषभ पंत अंपायरकडे गेला आणि त्याने अंपायरला सांगितलं की, मी रिव्ह्यूची मागणी केलीच नव्हती. मी फक्त रिव्ह्यू घेतोय असा इशारा केला होता. दोघांमध्ये चर्चा झाली आणि अंपायरने रिषभला सांगितलं की, तू DRS घेतला होता. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स संघाला आपला पहिला रिव्ह्यू गमवावा लागला.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Skin Care: दुकानात मिळणारे अ‍ॅलोव्हेरा जेल चेहऱ्यावर लावणे होतील 'हे' नुकसान; आजपासूनच घ्या काळजी

CBSE दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षांच्या तारखा जाहीर, दहावीची परीक्षा दोनदा होणार

Maharashtra Live News Update: कोरेगाव भीमामध्ये बसला आग, प्रवाशांंची धावाधाव

Accident News: भयंकर अपघात! दुचाकी समोरासमोर धडकल्या, पती-पत्नीसह तिघांचा जागीच मृत्यू

Earrings Designs: साडीपासून ते लेहेंग्यापर्यंत...; या कानातल्यांच्या डिझाईन्स आहेत कोणत्याही आऊटफिटसाठी परफेक्ट चॉइस

SCROLL FOR NEXT