Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन

Pune Porsche Car Accident Update News : पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणात पुराव्यात छेडछाड केल्याच्या आरोपातील विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन मिळाला आहे. या निर्णयामुळे चर्चित प्रकरणात मोठा ट्विस्ट आला आहे.
Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन
Pune Porsche Car Accident Vishal AgrawalSaam Tv
Published On
Summary
  • पुण्यातील कल्याणीनगर पोर्शे अपघात प्रकरणातील आरोपी विशाल अग्रवालला जामीन

  • पुरावे बदलल्याचा आरोप होता

  • पुणे पोलिसांनी २१ मे २०२४ रोजी आरोपीला अटक केली होती

  • सुप्रीम कोर्टाच्या निर्णयामुळे प्रकरणात नवीन घडामोड

अक्षय बडवे, पुणे

Pune Porsche Car Accident Vishal Agrawal पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. १९ मे २०२४ रोजी पुण्यातील कल्याणीनगर भागात झालेल्या पोर्शे कार अपघात प्रकरणी मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलून विशाल अग्रवालने पुराव्यामध्ये छेडछाड केली होती. त्यानंतर २१ मे रोजी विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक करण्यात आली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाकडून विशाल अग्रवालला दिलासा मिळाला असून त्याला जामीन मिळाला आहे.

पुण्यात १९ मे २०२४ च्या रात्री पुण्यातील कोरेगाव पार्क परिसरात एका हाय-स्पीड पोर्शे कारने दुचाकीवरून जाणाऱ्या दोन इंजिनियरला धडक दिली होती. या धडकेत अश्विनी कोस्टा आणि अनिश अवधिया यांचा जागीच मृत्यृ झाला होता. अपघाताच्या वेळी गाडी चालवणारा तरूण हा १७ वर्षांचा होता असून तो दारू पिलेला होता.

Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन
T20 World Cup 2026 : विजयोत्सव! तिरंग्यासह हार्दिक-इशानचा गरबा-भांगडा;भन्नाट डान्स पाहून माहिका-अदिती झाल्या फिदा, पाहा व्हिडिओ

त्यानंतर मद्यप्राशन केलेल्या मुलाचे रक्ताचे नमुने बदलण्यासाठी कारचालक आरोपी मुलाचा बाप असलेल्या विशाल अग्रवालने कारस्थान रचले होते. त्यामुळे, २१ मे २०२४ रोजी विशाल अग्रवाल याला पुणे पोलिसांनी छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली होती.

Pune : मोठी बातमी! पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरण, विशाल अग्रवालला सुप्रीम कोर्टाकडून जामीन
Kalyan : कल्याणमध्ये रक्ताने माखलेल्या कारचे रहस्य उलगडले, इंजिनीरिंगच्या विद्यार्थ्याने केली उबर चालकाची हत्या; धक्कादायक कारण समोर

रक्ताचे नमुने बदलल्याप्रकरणी डॉ.अजय तावरेंना देखील अटक करण्यात आली होती. १६ डिसेंबर रोजी त्यांचा जामीन सुद्धा न्यायालयाने फेटाळला होता. मात्र आता सुप्रीम कोर्टाकडून विशाल अग्रवालचा जामीन मंजूर करण्यात आला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News | Saam TV
saamtv.esakal.com