लखनऊ सुपर जायंट्स संघाने आतापर्यंत या हंगामात दमदार कामगिरी केलीय. या संघाने आतापर्यंत ४ सामने खेळले आहेत. यापैकी ३ सामने जिंकले असून केवळ एका सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. लखनऊ सुपर जायंट्स संघाकडून भन्नाट वेगाने गोलंदाजी करणाऱ्या मयांक यादवने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. मात्र गेल्या सामन्यात गोलंदाजी करत असताना तो दुखापतग्रस्त झाल्याचे पाहायला मिळाले होते. दरम्यान आता त्याच्या फिटनेसबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे.
लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स यांच्यादरम्यान झालेल्या सामन्यात मयांक यादव गोलंदाजी करता असताना दुखापतग्रस्त झाला होता. त्यामुळे त्याला मैदान सोडावं लागलं होतं. केवळ १ षटक टाकल्यानंतर तो मैदानाबाहेर गेला होता.
लखनऊ सुपर जायंट्स संघाचे हेड कोच जस्टीन लेंगर यांनी ईएसपीएनक्रीकइन्फोला दिलेल्या मुलाखतीत म्हटले की, ' गेल्या सामन्यात त्याला दुखापत झाली होती. दरम्यान स्कॅन केला असता ही दुखापत गंभीर नसल्याचं समोर आलं आहे. त्याने गुजरातविरुद्धच्या सामन्यात पहिलं षटक टाकल्यानंतर त्याला त्रास जाणवला.'
तसेच ते पुढे म्हणाले की, ' आम्ही त्याचा एमआरआय स्कॅन केला आहे. त्यात हलकी सूज असल्याचं दिसून आलं आहे. मी आशा करतो की, तो लवकर फिट होईल आणि खेळण्यासाठी मैदानात उतरेल. पुढील २ सामन्यांमध्ये तो खेळताना दिसून येणार नाही.'
मयांक यादवने वेगवान गोलंदाजी करता सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. तो पंजाब किंग्जविरुद्ध आपला पहिलाच सामना खेळण्यासाठी मैदानावर उतरला होता. या सामन्यात त्याने भन्नाट वेगाने गोलंदाजी करत ३ गडी बाद केले होते. त्यानंतर पुढील सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाविरुद्ध खेळतानाही त्याने ३ गडी बाद केले. अशाप्रकारे २ सामन्यांमध्ये त्याने आतापर्यंत ६ गडी बाद केले आहेत
सकाळ+चे सदस्य व्हा
Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.