Mayank Yadav Injury: लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! मयांक यादवबाबत समोर आली वाईट बातमी

LSG vs GT, IPL 2024: गुजरात टायटन्स संघाविरुद्ध झालेल्या सामन्यात लखनऊ सुपरजायंट्स संघाने शानदार विजय मिळवला. या विजयानंतर लखनऊला मोठा धक्का बसला आहे.
Mayank Yadav Injury:  लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! मयांक यादवबाबत समोर आली वाईट बातमी
Big blow for lucknow super gaints lsg speedstar mayank yadav injured in match against gujarat titans know latest update amd2000twitter

Mayank Yadav Injury Latest Update, LSG vs GT IPL 2024 :

लखनऊच्या इकाना स्टेडियमवर पार पडलेल्या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स हे दोन्ही संघ आमने सामने आले होते. या सामन्यात लखनऊ सुपर जायंट्स संघातील खेळाडूंनी दमदार कामगिरी करत गुजरात टायटन्स संघावर ३३ धावांनी विजय मिळवला. हा लखनऊचा या हंगामातील सलग तिसरा विजय ठरला आहे. दरम्यान या सामन्यानंतर लखनऊ सुपर जायंट्स संघाला मोठा धक्का बसला आहे. (Mayank Yadav Injury)

आयपीएल २०२४ स्पर्धेत केएल राहुलच्या नेतृत्वाखाली खेळणारा संघ जोरदार कामगिरी करतोय. आतापर्यंत सर्व संघांनी ४-४ सामने खेळले आहेत. दरम्यान लखनऊ सुपर जायंट्स संघाचं टेन्शन वाढलं आहे. गेल्या काय सामन्यांमध्ये मॅचविनर ठरलेल्या मयांक यादवला गुजरातविरुद्धच्या सामन्यात मैदान सोडावं लागलं आहे.

Mayank Yadav Injury:  लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! मयांक यादवबाबत समोर आली वाईट बातमी
MI vs DC, IPL 2024: ४,६,६,६,४,६... वानखेडेवर शेफर्डचं वादळ! नॉर्खियाला धू धू धुतला - Video

या सामन्यात एक षटक टाकल्यानंतर त्याला हॅमस्ट्रिंगची समस्या जाणवली. त्यामुळे तो मैदान सोडून बाहेर गेला. पहिल्या सामन्यापासूनच मयांक यादव हा सातत्याने ताशी १५० किमी गतीने गोलंदाजी करतोय. मात्र रविवारी झालेल्या सामन्यात त्याला केवळ २ वेळेस १४० पेक्षा अधिक गतीने गोलंदाजी करता आली. या षटकात त्याने १३ धावा खर्च केल्या. त्यानंतर तो फिजिओसोबत मैदानाबाहेर जाताना दिसून आला. (Cricket news in marathi)

Mayank Yadav Injury:  लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का! मयांक यादवबाबत समोर आली वाईट बातमी
MI vs DC, IPL 2024: मुंबईला अखेर विजयाचा सूर गवसला! शेफर्डच्या वादळानं पलटणचा दिल्लीवर शानदार विजय

हॅमस्ट्रिंगच्या समस्येमुळे मैदान सोडण्याची ही त्याची पहिलीच वेळ नाही. याआधीही रणजी ट्रॉफी स्पर्धेदरम्यान त्याला बाकावर बसावं लागलं होतं. आयपीएल २०२४ स्पर्धेत पंजाब किंग्जविरुद्ध झालेल्या सामन्यात त्याला पदार्पण करण्याची संधी मिळाली. पहिल्याच सामन्यात भन्नाट वेगवान गतीने गोलंदाजी करत त्याने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं होतं.

या सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्स संघाने प्रथम फलंदाजी करताना लखनऊ सुपर जायंट्स संघाने २० षटकअखेर ५ गडी बाद १६३ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना गुजरात टायटन्स संघाला १३० धावा करता आल्या. हा सामना गुजरातला ३३ धावांनी गमवावा लागला आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com