Ishant Sharma : इशांतचा जबरदस्त चेंडू, बेल्स हवेत तर रसेल जमिनीवर; VIDEO चा सोशल मीडियावर धुमाकूळ

Isahant Sharma, BALL OF IPL 2024 : दिल्लीच्या या पराभवानंतरही गोलंदाज इशांत शर्मा सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे. इशांत शर्माने आंद्रे रसेलच्या घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
Andre Russell Clean Bowled on ishant sharma
Andre Russell Clean Bowled on ishant sharmaSaam Tv

IPL 2024, KKR vs DC :

आयपीएल 2024 च्या 16 व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने दिल्ली कॅपिटल्सचा 106 धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना कोलकाताने 20 षटकांत 7 गडी गमावून 272 धावा केल्या. या धावसंख्येचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या दिल्लीचा संघ 17.2 षटकांत 166 धावांवर गारद झाला.

या विजयासह कोलकाताने विजयाची हॅटट्रिक केली आहे. दिल्लीच्या या पराभवानंतरही गोलंदाज इशांत शर्मा सोशल मीडियावर भाव खाऊन जात आहे. इशांत शर्माने आंद्रे रसेलच्या घेतलेल्या विकेटचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.(Latest News)

Andre Russell Clean Bowled on ishant sharma
IPL 2024: मुंबई इंडियन्ससाठी आनंदाची बातमी; मिस्टर ३६० सूर्या झाला फिट; कधी दिसणार मैदानात?

कोलकातासाठी शेवटच्या षटकात आंद्रे रसेल अत्यंत धोकादायक फलंदाजी करत होता. रसेलची आक्रमक फलंदाजी रोखण्याची आव्हान दिल्लीसमोर होतं आणि ते काम इशांत शर्माने करुन दाखवलं. दिल्लीसाठी शेवटचे षटक टाकण्यासाठी इशांत शर्मा आला. ईशांतने आंद्रे रसेलला चूक यॉर्कर टाकला. वेगाने आलेला चेंडू रसेलच्या बॅट आणि पायातून थेट स्टंप्सना जाऊन लागला. त्यावेळी बेल्स हवेत उडाल्या आणि रसेल देखील तोल गेल्याने खाली पडला. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

इशांतचा वेगाने आलेला परफेक्ट यॉर्कर रसेलला खेळता आला नाही. आऊट झाल्यानंतर रसेलने देखील ईशांतच्या त्या चेंडूला हातवारे करत टाळ्या वाजवून दाद दिली. IPL 2024 मधील इशांतचा धोकादायक आणि सर्वोत्तम यॉर्करचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे.

कोलकाताची पहिल्या स्थानी झेप

कालच्या विजयानंतर कोलकाता गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहोचला आहे. तर दिल्लीचा संघ नवव्या स्थानावर पोहोचला आहे. कोलकाताचा पुढील सामना चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 8 एप्रिल रोजी होणार आहे. तर दिल्लीचा संघ आपला पुढचा सामना मुंबई इंडियन्सविरुद्ध ७ एप्रिलला वानखेडेवर खेळणार आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com