DC vs KKR: सुनिल नारायणची चौफेर फटकेबाजी; ईशांत शर्माची जोरदार धुलाई, ६ चेंडूत ठोकल्या २६ धावा

IPL 2024 DC vs KKR Sunil Narine Batting : आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आहेत. विशाखापट्टणममध्ये कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलाय.
Sunil Narine Batting
Sunil Narine Battingx

Sunil Narine vs Ishant Sharma 26 Runs in 6 Balls :

आयपीएलच्या १६ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स हे संघ आमनेसामने आले. विशाखापट्टणममध्ये कोलकाताचा कर्णधार श्रेयस अय्यरने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. त्याला सुनील नारायणने झंझावाती सुरुवात केली. नारायणने अवघ्या २१ चेंडूत अर्धशतक ठोकलं. सुनीलने दिल्लीच्या सर्व गोलंदाजांची जोरदार धुलाई. मैदानाच्या चौफेर बाजुला फटकेबाजी केली. नारायण या हंगामामधील सर्वोधिक धावांची खेळी केली. (Latest News)

नारायणने अनुभवी गोलंदाज इशांत शर्माच्या गोलंदाजीवर सर्वाधिक धावा मिळावल्या. इशांत डावामधील चौथे षटक टाकण्यासाठी आला होता. या षटकात नारायणने तब्बल २६ धावा काढल्या. मिडऑफच्या पहिल्या चेंडूवर त्याने षटकार मारत ६ धावा केल्या. दुसरा चेंडू स्क्वेअर लेग बाऊंड्रीबाहेर पाठवला. त्याचा हा षटकातील सलग दुसरा षटकार होता. नारायणने तिसऱ्या चेंडूवर पॉइंटच्या दिशेने चौकार मारला. चौथ्या चेंडू त्याने सोडून दिला. त्यानंतर पाचव्या चेंडूवर त्याने मिडऑफच्या दिशेने षटकार मारला आणि सहाव्या चेंडूवर त्याने पॉइंटच्या दिशेने चौकार मारला.

दिल्लीविरुद्धच्या पॉवरप्लेमध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या फलंदाजांनी जोरदार फलंदाजी केली. यंदाच्या आयपीएल सीझनच्या पॉवर प्लेमध्ये सुनिल नारायणने जबदरस्त फंलदाजी केलीय.नारायणने आपल्या तीन डावात १०१ धावा केल्या आहेत. या धावा करण्यासाठी त्याचा स्ट्राइक रेट २२४.४५ राहिलाय. यात ६ चौकार आणि ९ षटकारांचा समावेश आहे.

तर केकेआर संघाने या सामन्यातील पावर प्लेमध्ये षटकात १ गडी गमावत ८८ धावा केल्या होत्या. आयपीएलच्या इतिहासातील पॉवर प्लेमधील ही कोलकाताची दुसरी सर्वोच्च धावसंख्या आहे. यापूर्वी २०१७ मध्ये केकेआरने बेंगळुरूमध्ये आरसीबीविरुद्ध ६ षटकात कोणतेही नुकसान न करता १०५ धावा केल्या होत्या.

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग ११ -

हिलिप सॉल्ट(यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर(कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारयण, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. [इम्पॅक्ट खेळाडू: सुयश शर्मा/वैभव अरोरा

दिल्ली कॅपिटल्स संघाचे संभाव्य प्लेइंग ११

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्ष/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. [इम्पॅक्ट खेळाडू: सुमित कुमार/रशीख दार सलाम.

Sunil Narine Batting
KKR vs SRH : हर्षित राणाने राखली कोलकाता नाइट राइडर्सची लाज; ४ धावांनी हैदराबादचा पराभव

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com