KKR vs SRH : हर्षित राणाने राखली कोलकाता नाइट राइडर्सची लाज; ४ धावांनी हैदराबादचा पराभव

KKR vs SRH : आयपीएलमधील तिसऱ्या सामन्यात कोलकाताचा निसटता विजय झाला. हर्षित राणाच्या गोलंदाजीने कोलकाताची लाज राखली. प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या संघाने निर्धारित २० षटकात आंद्रे रसेलने तुफान खेळी करत २५ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या.
KKR vs SRH :  हर्षित राणाने राखली कोलकाता नाइट राइडर्सची लाज; ४ धावांनी हैदराबादचा पराभव

KKR vs SRH Kolkata Knight Riders Team Won By 4 Runs :

आयपीएलच्या १७ व्या हंगामातील तिसरा सामना रंगतदार झाला. कोलकता संघाने दिलेल्या २०८ आव्हानाचा पाठलाग हैदराबादच्या खेळाडूं अपयशी ठरले. घरच्या मैदानात झालेल्या सामन्यात कोलकाता नाइट राइडर्सच्या खेळाडूंनी विजयी पतका फडकावली. संघाचा झालेला विजय पाहून कोलकाता संघाचा मालक बॉलिवूड अभिनेता शाहरूख खानही आनंदी झाला. (Latest News)

अखेरच्या चेंडूपर्यंत या सामन्यात चढ-उतार पाहायला मिळालेत. हैदराबाद आणि कोलकाताच्या सामन्यात क्रिकेट रसिकांना शाहरुख खानच्या चित्रपटांसारखं ड्रामा, अॅक्शन, इमोशन पाहायला मिळालं. हर्षित राणा कोलकाता संघाच्या विजयाचा शिल्पकार ठरला. अखेरच्या षटकात महत्त्वाचे दोन विकेट घेत राणाने कोलकाता संघाची लाज राखली.

प्रथम फलंदाजी करताना केकेआरच्या संघाने निर्धारित २० षटकात आंद्रे रसेलने तुफान खेळी करत २५ चेंडूत नाबाद ६३ धावा केल्या. रसेल आणि रिंकूच्या फटकेबाजीच्या जोरावर कोलकता संघाने २०८ धावा केल्या.या आव्हानाचा पाठलाग करताना हैदराबाद संघाने शेवट विजयाची आस लावून धरली होती. परंतु हर्षित राणाने दोन गडी बाद करत हैदराबादच्या विजयावर पाणी फेरलं. हेनरिक क्लासेनने २९ चेंडूत ६३ धावांची खेळी करत संघाला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. पण त्याच्या प्रयत्नाना यश आले नाही. क्लासेनला शाहबाज अहमदची साथ मिळाली होती. त्याने ५ चेंडूत २ षटकारांच्या मदतीने त्याने १६ धावा केल्या.

अखेरच्या षटक हर्षित राणा टाकत होता. राणा पहिल्याच चेंडूवर क्लासेनने षटकार ठोकला. त्यानंतर पुढच्या चेंडूवर एक धाव काढली. यानंतर तिसऱ्या चेंडूवर हर्षितने शाहबाज अहमदला बाद केलं. त्यानंतर ३ चेंडूत ६ धावा करायच्या होत्या. चौथ्या चेंडूवर जॅनसेनने सिंगल घेत क्लासेनला स्ट्राईक दिली. पाचव्या चेंडूवर मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात क्लासेनला सुयश शर्माने झेलबाद केलं. त्यावेळी शेवटच्या चेंडूवर ५ धावा करायच्या होत्या, पण कमिन्सला एकही धाव घेता आली नाही.

KKR vs SRH :  हर्षित राणाने राखली कोलकाता नाइट राइडर्सची लाज; ४ धावांनी हैदराबादचा पराभव
Rishabh Pant Video Viral: ऋषभ पंतची 'झक्कास' स्टम्पिंग पाहिली का? दिसली धोनीची झलक; क्रिकेट चाहते अवाक!

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com