IPL 2024 DC Vs KKR: दिल्ली कॅपिटल्स आणि केकेआरच्या संघात कोण असतील ४ सुपरस्टार, जाणून घ्या दोन्ही संघांची प्लेइंग ११

DC Vs KKR: विशाखापट्टणममधील स्टेडियमवर कोलकाता नाईट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्समध्ये सामना रंगणार आहे.दिल्लीने गेल्या सामन्यात गतविजेत्या चेन्नई सुपर किंग्जचा पराभव केला होता. केकेआरने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकले आहेत. आज कोलकाता नाईट रायडर्स विजयाची हॅट्ट्रिक साधणार आहेत का हे पाहावं लागेल.
IPL 2024 DC Vs KKR
IPL 2024 DC Vs KKRSaam Tv

DC vs KKR Probable Playing 11:

आयपीएल २०२४ चा १६ वा सामना दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात होणार आहे. हा सामना विशाखापट्टणम येथे होणार आहे. या सामन्यापूर्वी दिल्लीच्या संघाचा तीनपैकी दोन सामन्यात पराभव झालाय. दिल्लीने अखेरच्या सामन्यात सीएसकेला मात दिलीय. दुसरीकडे केकेआरने सुरुवातीचे दोन्ही सामने जिंकलेत. या सामन्यात कोलकात्याची नजर विजयाची हॅटट्रिककडे असेल. तर दिल्ली दुसऱ्या विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असेल. (Latest News)

या ४ खेळाडूंवर असेल नजर

दोन्ही संघातील २ मोठे खेळाडू कोण असू शकतात? गेल्या सामन्यात सुनील नारायणने गोलंदाजी आणि फंलंदाजीत आश्चर्यकारक कामगिरी केली होती. याशिवाय आंद्रे रसेलच्या खेळीवरही अनेकांच्या नजरा असतील. दिल्लीच्या संघातून गेल्या सामन्यात अर्धशतक झळकावणारा कर्णधार ऋषभ पंत आणि चमकदार गोलंदाजी करणारा खलील अहमदच्या गोलंदाजीकडे सर्वांचे लक्ष असेल.

या सामन्यात विजय मिळवण्यासाठी कोलकता संघाने अनेक डावपेच आखलेत. पृथ्वी शॉला स्वस्त माघारी पाठण्यासाठी वरुण चक्रवर्ती पॉवरप्लेमध्ये गोलंदाजीला येऊ शकतो. तर फिरकीपटूंना अधिक चांगली कामगिरी करण्याची गरज आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

दिल्ली संघाने शेवटचा सामना वरच्या क्रमावरील खेळाडूंच्या योगदानामुळे जिंकता आला. परंतु डावाच्या मध्य षटकांमध्ये संघाने आतापर्यंत सर्वाधिक विकेट्स गमावल्या आहेत. त्यामुळे दिल्लीचा संघाला काम करण्याची गरज आहे.

कोलकाता नाईट रायडर्स संभाव्य प्लेइंग ११ -

हिलिप सॉल्ट(यष्टीरक्षक), व्यंकटेश अय्यर, श्रेयस अय्यर(कर्णधार), रमणदीप सिंग, रिंकू सिंग, आंद्रे रसेल, सुनील नारयण, मिचेल स्टार्क, अनुकुल रॉय, हर्षित राणा, वरुण चक्रवर्ती. [इम्पॅक्ट खेळाडू: सुयश शर्मा/वैभव अरोरा

दिल्ली कॅपिटल्स संघाचे संभाव्य प्लेइंग ११

पृथ्वी शॉ, डेव्हिड वॉर्नर, मिचेल मार्श, ऋषभ पंत (यष्टीरक्ष/कर्णधार), ट्रिस्टन स्टब्स, अभिषेक पोरेल, अक्षर पटेल, एनरिक नॉर्टजे, मुकेश कुमार, इशांत शर्मा, खलील अहमद. [इम्पॅक्ट खेळाडू: सुमित कुमार/रशीख दार सलाम.

IPL 2024 DC Vs KKR
Visakhapatnam Pitch Report: दिल्ली-केकेआरमध्ये आज रंगणार सामना; धावांचा वर्षाव होणार का? जाणून घ्या पिच रिपोर्ट

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com