Visakhapatnam Pitch Report: दिल्ली-केकेआरमध्ये आज रंगणार सामना; धावांचा वर्षाव होणार का? जाणून घ्या पिच रिपोर्ट

Visakhapatnam Pitch Report: विशाखापट्टणम येथील स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकता नाइट रायडर्सचा सामना होणार आहे. या मैदानावरील पिच कशी आहे? या पिचवर धावा निघतील की विकेट पडतील, याचा अंदाज आपण घेऊया.
Visakhapatnam Pitch Report
Visakhapatnam Pitch Report
Published On

Visakhapatnam Pitch Report DC vs KKR Match:

विशाखापट्टणम येथील डॉक्टर वाय एस राजशेखर रेड्डी एसीए-वीडीसीए क्रिकेट स्टेडियमवर आज दिल्ली कॅपिटल्स आणि कोलकता नाइट रायडर्समध्ये लढत होणार आहे. हा सामना होण्याआधी आपण येथील पिच रिपोर्ट जाणून घेऊ. या मैदानात धावांची पाऊस होणार की विकेटवर विकेट पडणार? कोणत्या प्रकारच्या गोलंदाजांना फायदा होईल, हे जाणून घेऊ. (Latest News)

विशाखापट्टणम स्टेडियमच्या खेळपट्ट्यांची आकडेवारी पाहिली तर येथे देशांतर्गत खेळल्या गेलेल्या टी२० सामन्यांमध्ये पहिल्या डावातील सरासरी धावसंख्या १६० वर राहिलीय. परंतु १९० आणि २०० पेक्षा जास्तीची धावसंख्या तीनवेळा झालीय. दिल्ली कॅपिटल्सने येथे खेळलेल्या शेवटच्या सामन्यात पहिल्या डावात १९० हून अधिक धावा केल्या होत्या. यामुळे आज दिल्ली आणि कोलकाताच्या सामन्यातील पहिल्या डावात २०० धावा झाल्या तर आश्चर्य वाटू देऊ नका. कारण दोन्ही संघांची फलंदाजी उत्कृष्ट आहे. दोन्ही संघ आव्हानाचा पाठलाग करण्यास पटाईत आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

या मैदानावरील पिच गोलंदाजांसाठी आणि फलंदाजांसाठी चांगलीय. म्हणजेच काय फलंदाज धावा खेचू शकतात तर गोलंदाजही त्यांच्या कौशल्याने विकेट मिळवू शकतात. आतापर्यंत झालेल्या १४ सामन्यात ७ वेळा संघ अशाचप्रकारे जिंकलेत. ज्या संघाने दुसऱ्या डावात फंलदाजी केली असेल म्हणजेच आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरली असेल तर त्या संघाचा विजय झाल्याचा इतिहास आहे. तसेच हे पिच फिरकीपटूंसाठी उत्कृष्ट आहे, दोन्ही संघातील फिरकीपटू आपल्या खात्यात जास्तीत जास्त विकेट जमा करू शकतील.

कसं असेल हवामान

विशाखापट्टणम येथे दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कोलकाता नाइट रायडर्स सामना होणार आहे. या सामन्यादरम्यान येथील हवामान साफ ​​असेल. पाऊस होईल अशी एक टक्काही शक्यता नाहीये. मात्र खेळाडूंना उकाडा नक्कीच जाणवेल. कारण सामन्यादरम्यान तापमान ३० अंशांच्या आसपास असेल. विशाखापट्टणम हा समुद्रकिनारा आहे, त्यामुळे संध्याकाळी येथे आर्द्रता राहणार आहे, त्यामुळे खेळाडूंना त्रास होण्याची शक्यता आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Saam TV
saamtv.esakal.com